जिल्हाधिका-यांच्या दालनासमोर शेतक-यांचा एल्गार, पीक विम्याच्या पद्धतीत सुधारणेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 02:59 PM2019-07-04T14:59:57+5:302019-07-04T15:00:05+5:30

गत वर्षी पीकविम्याचे कवच घेणा-या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतक-यांची संख्या ३५ हजारांच्या आसपास आहे.

Farmers' agitation in front of District Collector | जिल्हाधिका-यांच्या दालनासमोर शेतक-यांचा एल्गार, पीक विम्याच्या पद्धतीत सुधारणेची मागणी

जिल्हाधिका-यांच्या दालनासमोर शेतक-यांचा एल्गार, पीक विम्याच्या पद्धतीत सुधारणेची मागणी

Next

वर्धा : गत वर्षी पीकविम्याचे कवच घेणा-या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतक-यांची संख्या ३५ हजारांच्या आसपास आहे. शिवाय मागील वर्षी गुलाबी बोंडअळी आणि निसर्गाच्या हलरीपणाचा चांगलाच आर्थिक फटका शेतक-यांना सहन करावा लागला. परंतु इफ्को टोकियो जनरल इंशुरन्स कंपनीने केवळ ७७९ शेतक-यांना नुकसानभरपाई पोटी नाममात्र आर्थिक मोबदला दिला. पीकविम्याची ही पद्धत शेतक-यांच्या अडचणीत भर टाकणारी असून त्यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिका-यांच्या दालनासमोर ठिय्या देण्यात आला.
 
या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. सदर निवेदन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्वीकारले. या आंदोलनाचे नेतृत्त्व माजी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केले. या आंदोलनात महेश आगे, प्रमोद वरभे, कृष्णा गुजरकर, अनिल डफरे, गजानन सावरकर, महादेव धोपटे, विनोद क्षीरसागर, गजानन निवल, प्रवीण पाल, अभय देवढे, ज्ञानेश्वर काळे, पुरुषोत्तम देवतळे, अनंत कोपरकर, गणेश तुमसरे, किशोर भोयर, अमोल आत्राम, रामेश्वर महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: Farmers' agitation in front of District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.