रस्त्यामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:16 AM2019-09-03T00:16:50+5:302019-09-03T00:17:24+5:30

मुख्य कालव्याच्या बाजुने असणारे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सुलभ ठरत होते. त्याच रस्त्याचा वापर सदर कालव्याची पाहणी करण्याकरिता सिंचन विभागाने कर्मचारी व अधिकारी करतात. ज्या रस्त्याने बैलबंडी व शेतकरी जीव मुठीत घेऊन जातात. त्या रस्त्याने संबंधित विभागाचे अधिकारी ये-जा करतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. संततधार पावसाने शेतकरी त्रस्त झाला आहे.

Farmers are in trouble due to the roads | रस्त्यामुळे शेतकरी अडचणीत

रस्त्यामुळे शेतकरी अडचणीत

googlenewsNext
ठळक मुद्देकोळोणा मुख्य वितरिका : बैलबंडी शेतात नेणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : निम्न वर्धा प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. परंतु आज कोळोणाच्या मुख्य वितरीकेचा रस्ता शेतकऱ्यांसाठी जीव मुळीत घेऊन चालण्या इतका खराब झाला आहे. सदर निम्न प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या.
काही शेतजमीनीचे तुकडे पडले. त्यामुळे शेतात जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्य कालव्याच्या बाजुने असणारे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सुलभ ठरत होते. त्याच रस्त्याचा वापर सदर कालव्याची पाहणी करण्याकरिता सिंचन विभागाने कर्मचारी व अधिकारी करतात. ज्या रस्त्याने बैलबंडी व शेतकरी जीव मुठीत घेऊन जातात. त्या रस्त्याने संबंधित विभागाचे अधिकारी ये-जा करतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. संततधार पावसाने शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतात जाणे कठीण झाले आहे. या विवंचनेने शेतकरी त्रस्त झाला आहे. निम्म वर्धा प्रकल्पामुळे या भागातील अनेक शेताचे तुकडे झाले आहेत. या भागात पावसामुळे चिखल निर्माण झाला असून या रस्त्यातून वाट काढणे शेतकºयांना कठीण जात आहे. पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन या भागातील रस्त्याची दुरस्ती करावी.

पांदण रस्त्याचेही तेच हाल
पालकमंत्री पांदण रस्ते कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या काळात लोकवर्गणीतून पांदण रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले. मात्र, पावसाळ्यात अनेक पांदन रस्त्यावर चिखल निर्माण झाला असून शेतकऱ्यांना शेतात बैलबंडी नेणेही कठीण झाले आहे. या पांदण रस्त्याचे खडीकरण करावे, अशी शेतकºयांची मागणी आहे.

Web Title: Farmers are in trouble due to the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.