शेतकऱ्यांनो सावधान, जरा जपून टाका पावलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 05:00 AM2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:00:19+5:30

शेतकऱ्यांना शेतात कामे करण्यासाठी सोबतच रखवाली करण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकऱ्यांला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकऱ्यांवर मृत्यूही ओढावते. अशा अनेक घटना जानेवारी ते जुलै या कालावधीत घडत आहेत.

Farmers, be careful, take care | शेतकऱ्यांनो सावधान, जरा जपून टाका पावलं

शेतकऱ्यांनो सावधान, जरा जपून टाका पावलं

Next
ठळक मुद्देसात महिन्यांत जिल्ह्यात ३७६ जणांना ‘स्नेक बाईट’ : पुलगाव तालुक्यात घडल्या सर्वाधिक घटना

चैतन्य जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्यात शेती कामांना वेग येतो. सोबतच बरसणाऱ्या पावसामुळे पिके जोमाने बहरतात. मात्र, अशावेळी सरपटणारे सापही याच शेतात वावरत असतात. तेव्हा शेतकऱ्यांनो अशावेळी सावध राहून शेतीकामे करणे गरजेचे झाले आहे. कारण जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ३७६ जणांना सर्पदंश झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
शेतकऱ्यांना शेतात कामे करण्यासाठी सोबतच रखवाली करण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकऱ्यांला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकऱ्यांवर मृत्यूही ओढावते. अशा अनेक घटना जानेवारी ते जुलै या कालावधीत घडत आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर या महिन्यांत सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात. पावसामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने साप बिळाबाहेर येऊन सुरक्षित जागा शोधतात. शेतशिवार ही त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित जागा असते. त्यामुळे सापांची संख्या शेतशिवारात अधिक दिसून येते.
जिल्ह्यात बहुतांश नागरिकांचा शेती हाच व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना दररोज आपल्या शेतात जावेच लागते. शेतात जाताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर सापांपासून स्वत:चे संरक्षण करणे कठीण जाते. यातूनच यावर्षी सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. सर्वाधिक घटना सर्पदंशाच्या घटना जुन आणि जुलै महिन्यात घडल्याच्या नोंदी जिल्हा सामान्य रुग्णालयात आहेत. जून महिन्यात १४६ तर जुलै महिन्यात १०१ जणांना सर्पदंश झाला आहे.

जहर फवारणीने १५ शेतकरी बाधित
सध्या शेती मशागतीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतात फवारणी करण्याची कामे जोरात सुरु आहे. फवारणी करतेवेळी योग्य काळजी न घेतल्याने फवारणीच्या विषबाधाने जिल्ह्यातील १५ शेतकरी, बाधित झाले आहे. फवारणी करताना अनेकांना विषबाधा झाली असून मृत्यूच्या घटनाही घडल्या आहे. त्यामुळे फवारणी करताना दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मृत्यूची नोंद नाही
शेतात काम करीत असताना साप चावल्यास शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची कुठलीही नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात नाही. मात्र, पोलीस दफ्तरी सर्पदंशाने मृत्यू झाल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात येत असतात. शेतकरी दगावल्यानंतर कुणीही याची नोंद रुग्णालयाकडे करण्यास जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्पदशांने मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालयाकडे नसल्याची माहिती आहे.

तीन महिन्यांत सर्वाधिक घटना
पावसाळ्याचे दिवस असून शेतकरी शेतीकामात व्यस्त आहेत. अशातच सर्पटणाऱ्या प्राण्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात ३४, जून महिन्यात १४६ तर जुलै महिन्यात १०१ जणांना सर्पदंश झाल्याची माहिती आहे.

आवश्यक लस उपलब्ध
सर्पदंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून त्यावर आवश्यक असलेली लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन दिली आहे. तरीही सर्पदंश होताच तत्काळ रुग्णालय गाठावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Farmers, be careful, take care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.