जंगली प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:06 PM2018-08-12T22:06:10+5:302018-08-12T22:06:34+5:30

नजीकच्या कामठी, सेवा, मजरा, पवनूर, नरसुला मौजामध्ये जंगली प्राणी रोही, डुक्कर शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर, ऊस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

Farmers feuded with the dangers of wild animals | जंगली प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी धास्तावला

जंगली प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी धास्तावला

googlenewsNext
ठळक मुद्देकामठी, पवनूर शिवारात कपाशी, सोयाबीन, तूर व ऊसाचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
आंजी (मोठी) : नजीकच्या कामठी, सेवा, मजरा, पवनूर, नरसुला मौजामध्ये जंगली प्राणी रोही, डुक्कर शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर, ऊस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
सध्या खरीप हंगामातील पिक चांगल्या अवस्थेत आहे पण जिल्ह्यात पुन्हा बोंडअळीचे आगमन झाल्याने शेतकरी, घाबरलेल्या अवस्थेत असतानाच जंगली प्राण्यांनी शेत शिवारात नुकसान करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
वनविभागाने या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे. वनविभागाकडून दिली जाणारी नुकसान भरपाई ही अल्प प्रमाणात असते. म्हणून वनविभागाने कायम स्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी संजय हाडके, वामन दुर्गे, गजानन कोहळे, सुभाष भामकर, अजय हाडके, माधवराव कारणकर, लक्ष्मणराव कोंडलकर, भिमराव लोखंडे, नितीन लाखे, पुरूषोत्तम देशमुख, सुरेश झाडे आदींसह शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Farmers feuded with the dangers of wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.