शेतकºयांची विद्युत वितरण कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:26 AM2017-11-03T00:26:08+5:302017-11-03T00:26:24+5:30
वीज वितरण कंपनी कृषी पंपाना नवीन वेळापत्रकानुसार वीज पुरवठा देत आहे. यामुळे शेतकºयांना नाहक त्रास सहन करीत शेतातील उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणी : वीज वितरण कंपनी कृषी पंपाना नवीन वेळापत्रकानुसार वीज पुरवठा देत आहे. यामुळे शेतकºयांना नाहक त्रास सहन करीत शेतातील उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. शेतकरी हित जोपासून सुरू केलेले भारनियमन बंद करावे. तसे होत नसल्यास नवीन वेळापत्रकानुसार भारनियमन करण्याची मागणी केली. याबाबत वीज कार्यालयावर धडक देत शेतकºयांनी कनिष्ठ अभियंता नेवारे यांना निवेदन सादर केले.
हिंगणी येथील उपकेंद्राने नुकतेच शेतीसाठी नवीन वेळापत्रक तयार करून भारनियमन सुरू केले. या वेळापत्रकानुसार महावितरण कंपनी शेतातील दिवसा वीजपुरवठा बंद करते तर रात्रीला सुरू ठेवते. परिणामी, शेतकºयांना रात्री शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत आहे. अनेक शेतकरी मोटारपंप सुरू करून घरी परत येतात. महावितरण कंपनी रात्रीही वेळोवेळी वीज पुरवठा खंडित करते. यामुळे रात्री जागलीला जावे लागते. रबी हंगामाला सुरुवात झाली आहे. गहू व तुरीच्या पिकाला पाण्याची गरज आहे; पण ते देता येत नाही. खासगी कंपन्यांना २४ तास वीज देणारे महावितरण कृषी पंपांना वीज देण्यास कुचराई करीत असल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत आहे. भारनियमन बंद करा, अन्यथा जुन्या वेळापत्रकाने वीजपुरवठा सुरू ठेवा, अशी मागणी शेतकºयांनी केली. निवेदन देताना नितीन निघडे, विजय डेकाटे, सातपुते, कांबळे, काळे, नागोसे आदी उपस्थित होते.