भुयारी मार्गासाठी शेतकऱ्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:03 PM2019-02-04T22:03:05+5:302019-02-04T22:03:21+5:30
स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावरील भुयारी मार्गाच्या मागणीसाठी परिसरातील शेतकरी, शेतमजुर व गोपपालकांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदांना सादर करण्यात आले असून वेळीच मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावरील भुयारी मार्गाच्या मागणीसाठी परिसरातील शेतकरी, शेतमजुर व गोपपालकांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदांना सादर करण्यात आले असून वेळीच मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
१०० फुट रूंदीचा एकपाळा पांदण रस्ता येथील शेतकऱ्यांसाठी तसेच एकुर्ली, अंदोरी व इतर गावांना जोडण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. या पांदण रस्त्यावर भुयारी मार्ग न सोडता चारपदरी महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. याबाबत संबंधितांना वेळोवेळी निवेदन देण्यात आली. खा. रामदास तडस तसेच सदर महामार्गाचे काम ज्या अधिकाºयांच्या देखरेखीत होत आहेत ते अधिकारी तसेच इतर अधिकाºयांनी मौका पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात भुयारी मार्गाचा विचार न झाल्याने अद्यापही समस्या कायम आहे. तहसीलदार बोंबर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल सादर करून भुयारी मार्ग आवश्यक असल्याचे नमुद केले. परंतु, गेल्या महिन्याभरात भुयारी मार्गाच्या निर्मितीबाबत कोणतेही पाऊल न उचलता महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या समस्यांवर मिठ चोळणाराच ठरत असल्याचा आरोप करीत सदर पांदण रस्त्यावर भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनात अशोक डाखोरे, गणेश गिरडे, महेश जोशी, अब्दुल जब्बार तंवर, मोहन ठाकरे, सुरेश वैद्य, रवी करोटकर, सुरेश कामडी, गणेश सुरकार, गजानन कारोटकर, अजय देशमुख, राजू इंगोले यांच्यासह परिसरात शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.