अवघ्या दहा मिनिटातच शेतकऱ्याचे कर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:05+5:30

ग्राहकांनी बँकेत येताना मास्क लावून साबणाने हात धुवून बँकेत यावे असा फलक बँक व्यवस्थापनाने लावला. नागरिक या आदेशाचे पालनही करीत आहे; परंतु शिवसेनेचे पदाधिकारी शाखा व्यवस्थापकांशी चर्चा करायला गेले त्यावेळी व्यवस्थापकांच्या तोंडाला मास्क नसल्याने आधी मास्क लावा हो साहेब, नंतरच बोला अशा शिवसैनिकांनी सूचना देताच शाखा व्यवस्थापक रघाटाटे यांनी तोंडाला मास्क लावला.

Farmers' loans approved in just ten minutes | अवघ्या दहा मिनिटातच शेतकऱ्याचे कर्ज मंजूर

अवघ्या दहा मिनिटातच शेतकऱ्याचे कर्ज मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेच्या आंदोलनाचा धसका : विरुळच्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : येथील बँकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून शिवसेना जिल्हाप्रमुखांनी आंदोलनाची धमकी देताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या दहा मिनिटातच शेतकऱ्याचे कर्जप्रकरण मंजूर केले.
जुलै महीना आला तरी अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख व शिवसैनिकांनी स्टेट बँकेला भेट देऊन शाखा व्यवस्थापक रघाटाटे व कृषी बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. यापुढे पीककर्जाच्या तक्रारी प्राप्त झाल्या तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. बँकेने पीककर्ज प्रकरण त्वरित निकाली काढून शेतकऱ्यांचे समाधान केले. यावेळी पुलगाव शहर प्रमुख नाना माहुरे, राजाभाऊ खेडकर, ओंकार धांदे, आर्वी पंचायत समितीच्या उपसभापती शोभा मनवर, विरुळचे उपसरपंच नितीन पोलकडे, कैलास उपासे, नाना सोनटक्के यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी या वेळी उपस्थित होते.

बँकेत अपुरा कर्मचारीवर्ग; कामकाजावर परिणाम
येथील बँक व्यवस्थापक कोरोना काळात मुंबईला गेले असून चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे मुंबईतच अडकले आहेत. त्यामुळे तात्पुरता कार्यभार रघाटाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या बँकेत अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने नागरिकांची वेळीच कामे होत नाहीत. एटीएम मागील चार महिन्यांपासून बंद आहे. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष नाही.

आधी तोंडाला मास्क लावा हो साहेब...
ग्राहकांनी बँकेत येताना मास्क लावून साबणाने हात धुवून बँकेत यावे असा फलक बँक व्यवस्थापनाने लावला. नागरिक या आदेशाचे पालनही करीत आहे; परंतु शिवसेनेचे पदाधिकारी शाखा व्यवस्थापकांशी चर्चा करायला गेले त्यावेळी व्यवस्थापकांच्या तोंडाला मास्क नसल्याने आधी मास्क लावा हो साहेब, नंतरच बोला अशा शिवसैनिकांनी सूचना देताच शाखा व्यवस्थापक रघाटाटे यांनी तोंडाला मास्क लावला.

Web Title: Farmers' loans approved in just ten minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.