निम्न वर्धा प्रकल्प कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:00 AM2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:00:38+5:30
कंत्राटदारांच्या वादात काम बंद झाल्याने निंबोलीवासीयांनी गुरुवारी निम्न वर्धा प्रकल्प कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनादरम्यान या विभागाने पहिल्या कंत्राटदाराचे देयक न दिल्यानेच दुसºयाही कंत्राटदाराने काम थांबविले. तसेच उपअभियंत्याने पहिल्या कंत्राटदाराला पोलिसात तक्रार करण्याचा इशारा दिल्याचेही सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील निंबोली येथील रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्याचे बांधकाम दोन कंत्राटदाराच्या वादात अडकल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर निम्न वर्धा प्रकल्प कार्यालयात ठिय्या मांडून तत्काळ कामपूर्ण करण्याची मागणी लावून धरली. तसेच या मागणीचे निवेदन उपअभियंत्याना दिले.
काही महिन्यांपूर्वी निम्न वर्धा प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे निंबोली ते वाढोणा व अंतरडोह रहा स्ता पूर्ण बंद झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी निम्न वर्धा प्रकल्प कार्यालयाकडे करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेत कार्यकारी अभियंता रवी वºहाडे यांनी तात्पुरत्या स्वरुपात दुसऱ्या बाजुने रस्ता दुरुस्तीचा कंत्राट दिला होता. त्यानंतर वाढोणा रस्त्यावरील शेतकऱ्यांनी जाण्यास मनाई केल्याने रस्त्याचे काम थांबविण्यात आले. म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी जुन्याच रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात कंत्राटही देण्यात आला. यापूर्वी काम सुरू करणे व उर्वरित देयकाबाबत चर्चा करण्यात आली होती. परंतु २ तारखेला कंत्राटदार काम सुरू करण्यास गेले असता तिथे दुसऱ्याच कंत्राटदाराने काम सुरू केले होते. त्यामुळे दोन्ही कंत्राटदामध्ये चर्चा झाल्यावर नवीन कंत्राटदारानेही रस्त्याचे काम थांबविले.
कंत्राटदारांच्या वादात काम बंद झाल्याने निंबोलीवासीयांनी गुरुवारी निम्न वर्धा प्रकल्प कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनादरम्यान या विभागाने पहिल्या कंत्राटदाराचे देयक न दिल्यानेच दुसऱ्याही कंत्राटदाराने काम थांबविले. तसेच उपअभियंत्याने पहिल्या कंत्राटदाराला पोलिसात तक्रार करण्याचा इशारा दिल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे तत्काळ काम मार्गी लावा अन्यथा ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. यावेळी अनिल काळे, शैलेश काळे, बबनराव देशमुख, जितेंद्र काळे, मनोज काळे, श्रीधर काळे, अमित काळे, सिरीश काळे, किशोर काळे, कार्तिक काळे यांची उपस्थिती होती.