शेतकऱ्यांचा तहसीलवर आज मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 AM2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:12+5:30
अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप व रब्बी पिकांना या पावसाने तडाखा दिला. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीकरिता सोमवारी १३ ला माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक देणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : तालुक्यातील बुरकोणी लाडकी, चिचघाट, काजळसरा, मानोरा आदी भागांमध्ये गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानाची माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप व रब्बी पिकांना या पावसाने तडाखा दिला. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीकरिता सोमवारी १३ ला माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक देणार आहेत.
अवकाळी पावसामुळे कापूस, तूर, गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. खरीप व रब्बी पिकांची वाताहत झाली. कपाशी पिकाने जमिनीवर लोळण घेऊन कापूस मातीमोल झाला. तूर पिकाचेही नुकसान झाले. गहू पीक गारपिटीने जमिनीवर झोपले. तर हरभºयाला मार बसला. बी-बियाणे मशागतीवर व खत तसेच फवारणी साठी कर्ज काढून कर्ज केल्यानंतर आता पीक येत असताना अवकाळी पावसाने शेतकºयांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानभरपाई मिळण्याकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.