भारनियमनाबाबत शेतक:यांचा अधीक्षक अभियंत्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:28 AM2017-10-24T11:28:27+5:302017-10-24T11:31:55+5:30
शेतीला पाणीपुरवठा योग्य प्रकारे मिळावा यासाठी विद्युत भारनियमन बंद करण्याची मागणी करण्यासाठी मंगळवार सकाळी शेतकºयांनी अधिक्षक अभियंत्यांना घेराव घातला.
वर्धा : शेतीला पाणीपुरवठा योग्य प्रकारे मिळावा यासाठी विद्युत भारनियमन बंद करण्याची मागणी करण्यासाठी मंगळवार सकाळी शेतकºयांनी अधिक्षक अभियंत्यांना घेराव घातला.
धोतरा मदनी वायगाव सब-स्टेशन परिसरातील गावामध्ये गेल्या १ महिन्यापासून शेतीपंपचे रात्रीचे भारनियमन सुरू आहे त्यामुळे शेतीला आवश्यक असणारे पाणी पिकाला देण्यात शेतकºयांना अडचण जात आहे. आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसाच्या वेळेत विद्युत पुरवठा सुरू असतो. तसेच चार रात्री तो देण्यात येतो. या वेळा गैरसोयीच्या असून दिवसाचा विद्युत पुरवठा पाच दिवस देण्यात यावा अशी शेतकºयांची मागणी आहे. माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्वात तळेगांव, टा.वायगाव नि.आष्टा, नेरी भुगाव, करंजी काजी, जउलगाव, सोनेगाव स्टे. येथील अनेक शेतकºयांनी मंगळवारी सकाळी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता म.रा.वि.म. ह्यांना कार्यालयात घेराव घालून वीज 3 दिवस ऐवजी ५ दिवस करण्याची मागणी लावून धरली. यावेळी 3 दिवसाऐवजी ४ दिवस वीज दुपारी देण्याबाबत मागणी मान्य करण्यात आली तसेच ५ व्या दिवसाची मागणी मान्य करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. याप्रसंगी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.