केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे शेतकऱ्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:59 PM2018-09-04T23:59:27+5:302018-09-05T00:01:24+5:30
गतवर्षी बोंडअळीने परिसरातील कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गतवर्षीच्या नुकसानीमुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांचे बारकाईने निरीक्षण असून विशेष काळजी घेतल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहणा : गतवर्षी बोंडअळीने परिसरातील कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गतवर्षीच्या नुकसानीमुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांचे बारकाईने निरीक्षण असून विशेष काळजी घेतल्या जात आहे.
कापसावर यावर्षी बोंडअळीचे प्रमाण केवळ ५ ते १० टक्केच असून बुरशीजन्य रोगांमुळे बोंड सडण्याचे प्रमाण मात्र दिसून येतात. त्याची दखल घेत शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविण्यात याव्यात व बुरशीसदृश्य रोगांमुळे बोंड सडण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्या पार्श्वभूमीवर पृथ्थकरण करण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे अमृतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेतकºयांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने अमृतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या परिसरातील शेतकऱ्यांचा गट तयार करण्यात येवून कपाशी पिकावर येणाऱ्या रोगांचे निरीक्षण करून त्याचे संशोधन व उपाययोजना करण्याकरिता नागपूर येथील केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेत रोगग्रस्त कपाशी झाडे नेऊन रोगनिराकरण उपाययोजनांचे मार्गदर्शन या शेतकरी मार्गदर्शन गटामार्फत परिसरातील शेतकऱ्यांना दिल्या जात आहे.
प्रत्येक गावासाठी कृषी सहाय्यकांची पदे नेमलेली असताना सुध्दा ते मार्गदर्शन करण्यास असमर्थ ठरले आहे. धास्तावलेल्या शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून या शेतकरी मार्गदर्शक गटाने पुढाकार घेतला आहे. रोगग्रस्त कपाशी झाडे नागपूर येथील कापूस संशोधन केंद्राच्या वैज्ञानिकांकडून तपासून रोगनिदान केला जात आहे.
या गटांमध्ये अमृतराव देशमुख यांच्यासह सतीश रेड्डी, प्रशांत बोबडे, युवराज देशमुख, सतीश डोबले, आशिष हांडे, राजेश रेवतकर, सुनील ढोले, गोपाल पालीवाल, अशोक पालीवाल, उमेश ठाकरे यांच्यासह परिसरातील प्रगतशील शेतकºयांचा समावेश आहे.
पोहणा परिसरातील कपाशी पिकांकडे आमचे बारकाईने लक्ष असून आलेल्या रोगांचे कापूस संशोधन संस्थेमार्फत निदान करून त्यावरील उपाययोजना शेतकºयांना सांगण्यात येईल.
- प्रशांत बोबडे, प्रगतशील शेतकरी पोहणा.