शेतकऱ्यांचा रस्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:29 PM2018-06-02T23:29:31+5:302018-06-02T23:29:31+5:30
देशातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत देशव्यापी शेतकरी संपाची हाक दिली. या संपात शेतकºयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी रोठा येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी टायर जाळून तथा भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाच्या शेती व शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत देशव्यापी शेतकरी संपाची हाक दिली. या संपात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी रोठा येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी टायर जाळून तथा भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाच्या शेती व शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.
शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी वर्धा लगतच्या रोठा येथे शेतकऱ्यांनी टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले. यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यातील काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. संपात रोठा व परिसरातील गावांतील शेतकरी सहभागी झाले होते. शहरांमध्ये भाजीपाला, दूध न विकण्याचा निर्णय घेत अनेक शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातच त्याची विक्री करण्याचे ठरविले आहे. यामुळे वर्धा शहराला काही प्रमाणात दूध, भाजीपाल्याच्या टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या आंदोलनाचाच एक भाग म्हणून किसान अधिकार अभियान तथा विविध शेतकरी संघटनांद्वारे विविध शासकीय कार्यालयांत बैठा सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. या सत्याग्रहादरम्यान ते मागील चार वर्षांत शेतकरी हिताकरिता काय योजना राबविल्यात याची माहिती घेत आहेत. यानंतर सदर माहितीच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अभियानचे अविनाश काकडे यांनी दिली.
शेतकरी संपात राष्ट्रवादी काँगे्रसचीही उडी
विविध शेतकरी संघटनांच्या संपाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. यामुळे शहरांत भाजीपाला, दूध यासह अन्य शेतमालाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संपात राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेत संपाला पाठींबा दिला आहे. राकाँच्या पदाधिकाऱ्यांनी भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. रविवारी सावंगी टी-पॉर्इंट येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहितीही रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व पदाधिकाऱ्यांनी दिली.