शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By Admin | Published: May 28, 2015 01:31 AM2015-05-28T01:31:11+5:302015-05-28T01:31:11+5:30

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून स्थानिक नागसेननगर येथील चंदू मारोतराव उईके (४०) या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल घेत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

Farmer's self-effort | शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

googlenewsNext

वर्धा : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून स्थानिक नागसेननगर येथील चंदू मारोतराव उईके (४०) या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल घेत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागसेननगर येथील चंदू उईके यांच्याकडे १२ एकर शेती आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल नजीकच्या मोहगाव येथील शेतात यंदा त्याने कपाशी, सोयाबीन, भुईमुंग व ज्वारी पिकांचा पेरा केला. यासाठी त्याने गावातील ओळखीच्या व्यक्तींकडून पैसे उसनवारीवर घेतले; पण उत्पन्न न झाल्याने तो विवंचनेत होता. दरम्यान, मंगळवारी दुपारी पेट्रोल आणून जाळून घेतले. ही बाबत नागरिकांच्या लक्षात येताच त्यास सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Farmer's self-effort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.