उन्हाची तमा न बाळगता शेतकरी ‘आत्मा’च्या मेळाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 05:00 AM2022-04-27T05:00:00+5:302022-04-27T05:00:15+5:30
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सोमवारी ४५ नंतर मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअस असतानाही जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून तब्बल ३५८ शेतकऱ्यांनी सेवाग्राम भागातील चरखा पॉइंट गाठून शेतकरी मेळाव्यातील विविध विषयांची माहिती जाणून घेतली. एकूणच शेतकरी मेळाव्याच्या पहिल्या दिवशी उन्हाची तमा न बाळगता ३५८ शेतकऱ्यांनी आत्माच्या मेळाव्याला भेट दिल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी अभियान अंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्या संयुक्त विद्यमाने सेवाग्राम भागातील चरखा पाॅइंट भागात दोन दिवसीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मंगळवारी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. जीवन कतोरे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
उद्घाटनपर कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सोमवारी ४५ नंतर मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअस असतानाही जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून तब्बल ३५८ शेतकऱ्यांनी सेवाग्राम भागातील चरखा पॉइंट गाठून शेतकरी मेळाव्यातील विविध विषयांची माहिती जाणून घेतली. एकूणच शेतकरी मेळाव्याच्या पहिल्या दिवशी उन्हाची तमा न बाळगता ३५८ शेतकऱ्यांनी आत्माच्या मेळाव्याला भेट दिल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
२० स्टॉलवर देण्यात आली माहिती
- शेतकरी मेळाव्याचे औचित्य साधून सेवाग्राम येथील चरखा पॉइंट भागात बियाणे, खत, औषधे तसेच शेतीविषयक विविध साहित्याची माहिती देणारे २० स्टॉल उभारण्यात आले आहेत. मंगळवारी याच स्टॉलला तब्बल ३५८ शेतकऱ्यांनी भेटी देत अधिकची माहिती जाणून घेतली.