शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:21 AM2018-08-30T00:21:31+5:302018-08-30T00:23:15+5:30

नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने सुरू असले तरी शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने मंगळवारी कान्हापूर नजीक शेतकऱ्यांनी काम अडविले. या मार्गावर कान्हापूर व गोंदापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याच्या रूंदीकरणासाठी घेण्यात आल्या.

Farmers stopped working on the road | शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम पाडले बंद

शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम पाडले बंद

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग : शेतीचा मोबदला मिळाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने सुरू असले तरी शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने मंगळवारी कान्हापूर नजीक शेतकऱ्यांनी काम अडविले.
या मार्गावर कान्हापूर व गोंदापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याच्या रूंदीकरणासाठी घेण्यात आल्या. पण सदर शेतकऱ्यांच्या शेतात जेसीबीद्वारे काम करण्यास सुरूवात केली. ही बाब शेतकऱ्यांना माहिती होताच सदर शेतकरी शेतात पोहचले व जमीनीचा मोबदलाच मिळाला नसल्याने आपण येथे काम करू नये असा पवित्रा घेतला. सदर कंपनीच्या व्यक्तीने ही बाब सांमजस्याने घेवून सदर काम बंद ठेवले तरी शेताचा मोबदला मिळेपर्यंत काम होऊ न देण्याचा इशारा धनराज इखार, सुभाष भुरे, सुनिल इखार, मारोतराव बेले, गणपत बोरकर आदी शेतकºयांनी घेतला आहे.
एकाच तालुक्यात अनेक मार्गावर काम सुरू
सेलू तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचेच काम सुरू नाही. तर विविध मार्गाचे काम सुरू होत आहे. विकास चौकापासून बोरधरणकडे एक महामार्ग करण्यात येत आहे. हा मार्ग रूंद केला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे तसेच महावितरणचे खांबही हटवावे लागणार आहे. नागपूर- तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग देवळी तालुक्यातूनही जात आहे. तेथे ही अनेक शेतकऱ्यांना मोबदला न देता काम सुरू करण्यात आले होते. खा. रामदास तडस यांनी याबाबत पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ना. नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला.

Web Title: Farmers stopped working on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.