शेतकऱ्यांची महावितरणवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:22 PM2017-12-05T22:22:39+5:302017-12-05T22:22:59+5:30
कृषी क्षेत्राकरिता वेळी-अवेळी होत असलेले भारनियमन आणि कृषी पंपाच्या थकबाकीदरांना होत असलेला त्रास कमी करण्याच्या मागणीकरिता शेतकरी संटनेच्यावतीने मंगळवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या बोरगाव (मेघे) येथील कार्यालयावर धडक दिली.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : कृषी क्षेत्राकरिता वेळी-अवेळी होत असलेले भारनियमन आणि कृषी पंपाच्या थकबाकीदरांना होत असलेला त्रास कमी करण्याच्या मागणीकरिता शेतकरी संटनेच्यावतीने मंगळवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या बोरगाव (मेघे) येथील कार्यालयावर धडक दिली. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून दुपारी शेतकºयांचा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भारनियमनासह वेळापत्रकात तात्काळ बदल करण्यात यावा यासह शेतकºयांच्या विविध मागण्यांचे निवेदन केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून निघालेला मोर्चा दुपारी १.३० वाजताच्या सुमारास बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडकला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना महावितरणच्या कार्यालयाच्या मुख्य द्वारावर अडविले. त्यानंतर आंदोलनाची माहिती महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आली. महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यावेळी कार्यालयात गैरहजर असल्याने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी महावितरणचे सदावर्ते व उरकुडे यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी शेतकरी संघटनेच्यावतीने अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील विविध भागात महावितरणच्यावतीने सध्या सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे किंवा शेतकºयांना शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी सोईचे होईल, अशा पद्धतीने भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा, जिल्ह्यातील सर्वच कृषीपंपांना दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा, थकबाकी असल्याचे कारण पूढे करून कृषीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात असून हा प्रकार तात्काळ थांबविण्यात यावा, अनेक शेतकºयांना सरासरी काढून विद्युत देयके दिली जात आहेत. महावितरणच्या कर्मचाºयांकडून प्रत्येक कृषी मिटरचे रिडिंग घेत शेतकºयांना योग्य देयके देण्यात यावी, आदी मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या.
आंदोलनात मधुसूदन हरणे, शैला देशपांडे, सतीश दाणी, गंगाधर मुटे, उल्हास कोटंबकर, सचिन डाफ, अरविंद बोरकर, राऊत, शांताराम भालेराव, प्रकाश जिकार, खुशाल हिवरकर, प्रमोद तलमले, मंगेश मानकर यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.