कॅनलच्या अर्धवट कामाने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:04 PM2019-06-03T22:04:04+5:302019-06-03T22:04:17+5:30
जलयुक्त शिवार करण्याकरिता शासन कटीबध्द असल्याने याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना राबवित असल्याचे दिसून येते. याच योजनेअंतर्गत निम्न वर्धा प्रकल्पातंर्गत शेत शिवारात कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहेत. पण सदर कालव्याचे नियोजनबद्द काम होत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : जलयुक्त शिवार करण्याकरिता शासन कटीबध्द असल्याने याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना राबवित असल्याचे दिसून येते. याच योजनेअंतर्गत निम्न वर्धा प्रकल्पातंर्गत शेत शिवारात कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहेत. पण सदर कालव्याचे नियोजनबद्द काम होत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे.
येथील शेतकरी प्रमोद गजानन पाटील यांचे सोनेगाव (आ.) पांदन रस्त्याच्या बाजुला चिकणी शिवारात ४ एकर ओलीताखालील शेत आहेत. याच शेतातील ०.७८ हे.आर. शेत निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्यात गेले. याची ८० टक्के रक्कम मिळाली पण उर्वरीत रक्कम व अधिग्रहीत विहिर व आम्रवृक्ष यांची मात्र आतापर्यंत रक्कम मिळाली नाहीत.
याच शेतातून ०.७८ हे.आर मधून मोठा कालवा गेला आहेत. याच कालव्याचे पाणी शेताला लागुन असलेल्या नाल्यात सोडण्याकरिता पाटील यांच्या शेतातून नाली काढण्यात आली. परंतु कालव्याच्या तोंडाजवळ सिमेंटीकरण केलेत व नंतर ३० मिटर जागा सोडून पुन्हा सिमेंटीकरण करण्यात आले. परंतु मध्य भागातच ३० मीटरच्या नालीचे बांधकाम न केल्यामुळे येणारे पाणी सरळ शेतात घुसून शेत पडीत पडण्याची दाट शक्यता आहे. संबंधीत विभागाने लक्ष देऊन अर्धवट सोडलेल्या नालीचे पुर्णत: सिमेंटीकरण करावेत अशी मागणी प्रमोद पाटील यांनी केली. अशीच परिस्थिती या भागात अनेक ठिकाणी असल्याचे दिसून येत आहे.
मी या शेतात ६ ट्रॉली शेणखत टाकले. परंतु ३० मीटर नालीचे सिमेंटीकरण न केल्यामुळे येणाऱ्या पाण्यामुळे पुर्णच शेणखत वाहून जाईल. यात माझे मोठे नुकसान होणार आहे.
- प्रमोद पाटील, श्ोतकरी चिकणी.