उपजीविका उपक्रमांतर्गत शेतकºयांनी केली पशुधन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 10:14 PM2017-10-03T22:14:22+5:302017-10-03T22:14:35+5:30

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत पानलोट समिती वडाळा, मोई, पोरगव्हाण येथील लाभार्थी शेतकºयांनी बाजार क्षेत्र राजुरा बाजार येथून पशुधन खरेदी केले.

Farmers undertook livelihood purchase under livelihood initiative | उपजीविका उपक्रमांतर्गत शेतकºयांनी केली पशुधन खरेदी

उपजीविका उपक्रमांतर्गत शेतकºयांनी केली पशुधन खरेदी

Next
ठळक मुद्देथेट लाभाची योजना : तीन गावांमध्ये कार्यक्रमावर अंमल

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी(श.)/आंजी(मोठी): एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत पानलोट समिती वडाळा, मोई, पोरगव्हाण येथील लाभार्थी शेतकºयांनी बाजार क्षेत्र राजुरा बाजार येथून पशुधन खरेदी केले. यामुळे याचा लाभ थेट शेतकºयांना मिळाला. उपजीविका उपक्रमांतर्गत शेतकºयांनी हे पशुधन खरेदी केले आहे.
केंद्र शासन व वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे अंतर्गत राज्यभर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम सुरू आहे. जिल्ह्यात आष्टी तालुक्यात दोन प्रकल्प मिळून ९ गावांत हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाचे २०१७-१८ हे शेवटचे वर्ष असून उपजीविका उपक्रमांतर्गत सुक्ष्म उद्योजकता व उत्पादन पद्धती या स्वरूपात शेतकºयांना अनुदानास्तव शेती पुरक व्यवसाय, यंत्र सामुग्री खरेदी करणे अपेक्षित आहे. याचा लाभ समितीच्या खात्यातून शेतकºयांच्या खात्यात वर्ग केला जातो; पण त्या मोबदल्यात शेतकºयांना उपजीविका बाबीखाली असलेल्या बस्तूंची खरेदी करीत विकास निधी समितीच्या खात्यात भरावा लागतो. शासनाचा हा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचावा म्हणून कृषी विभाग, पाणलोट समिती प्रयत्नरत आहे. आष्टी तालुक्यातील ९ पैकी वडाळा, पोरगव्हाण, मोई पशुधन आराखड्यात होते. पशुधन खरेदीसाठी तालुका कृषी अधिकाºयांच्या निमंत्रणात पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, कृषी पर्यवेक्षक, पानलोट समिती सचिव, अध्यक्ष, लाभार्थी अशी समिती गठित करण्यात आली होती. निधी समिती खात्यावर जमा झाल्यानंतर शेतकºयांनी व्यवसाय सुरू करून लाभ घ्यावयाचा होता. यात वडाळा, पोरगव्हाण, मोई समितीतील शेतकºयांनी राजुरा येथून बºयाच प्रमाणात शेळ्यांची खरेदी केली. यात जनावरांच्या संरक्षणाकरिता त्यांचा विमाही काढण्यात आला. व्यवसाय सुरू झाल्यानंतर वा यांत्रिकीकरणातून वस्तू खरेदी केल्यानंतर सरळ व त्वरित लाभ मिळणारा हा एकमेव कार्यक्रम शेतकरी हिताचा असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.

Web Title: Farmers undertook livelihood purchase under livelihood initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.