शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणारच; आदित्य ठाकरे यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 03:56 PM2019-08-28T15:56:55+5:302019-08-28T15:57:22+5:30
शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभी राहणार असून त्यासाठीच मी राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जनसंवाद यात्रेतून आपले आशिर्वाद घेण्यासाठी पोहोचलो आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. त्या सर्वांना कर्जमुक्त केले जाईल असे आश्वासन युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिले. आर्वी येथील गांधी चौकात मंगळवारी रात्री त्यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, सचिन अहिर, खा. राजन विचारे, शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अशोक शिंदे, वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, जिल्हा प्रमुख राजेश सराफ, बाळा शहागडकर, माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख, माजी उपजिल्हाप्रमुख महेश चौधरी, महिला आघाडी प्रमुख सुधा शिंदे, अभिनंदन मुनोद, मुंबईचे राजू दिक्षीत आदी उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाग मिळालेला नाही. त्या १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रूपये विमा प्रदान करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभी राहणार असून त्यासाठीच मी राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जनसंवाद यात्रेतून आपले आशिर्वाद घेण्यासाठी पोहोचलो आहे. प्रास्ताविक जिल्हा उपप्रमुख बाळा जगताप तर संचालन नितीन हटवार यांनी केले.