शेतमालाच्या पडत्या भावाने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:47 PM2017-12-01T23:47:07+5:302017-12-01T23:47:30+5:30

विदर्भातील शेतकरी उत्पादन घेत असलेल्या शेतमालांच्या किंमती प्रचंड प्रमाणात मागील तीन वर्षात घसरल्यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

Farmers worried about rushing farmers | शेतमालाच्या पडत्या भावाने शेतकरी चिंताग्रस्त

शेतमालाच्या पडत्या भावाने शेतकरी चिंताग्रस्त

Next
ठळक मुद्देतीन वर्षात कमालीची घसरण : हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भातील शेतकरी उत्पादन घेत असलेल्या शेतमालांच्या किंमती प्रचंड प्रमाणात मागील तीन वर्षात घसरल्यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याची वेळ आली आहे. शेतमालाच्या या घसरत्या किंमतीमुळे शेतकरी व त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहे.
विदर्भात कापूस, ऊस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तूर, उडीद, मुंग, सूर्यफुल, हरभरा व तीळ हे पीक घेतले जातात. कापूस हे खरीप हंगामातील नगदी पीक आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करीत असतात. २०११ मध्ये कापसाला ३४०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. त्यानंतर २०१२ मध्ये ३८०० रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी झाली. २०१३ मध्ये ४२०० तर २०१४ मध्ये ४६०० रुपये प्रतिक्विंटल भाव कापसाला मिळाला. २०१५ मध्ये ४१०० तर २०१६ मध्ये ३८०० ते ४००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. २०१७ मध्ये कापसाचा ४४०० रुपयांवर आहे. कापसाच्या भावात सतत दरवर्षी कमी दर मिळत आहे. कापसाच्या शेतीला लागणारा खर्च वसूल होणे कठीण झाले आहे.
यंदा बोंडअळी शेतकºयांचे पीक पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे लागलेला ही खर्च मिळालेला नाही. सरकीच्या भावात मंदी असल्याने कापसाचा भाव ४४०० रुपयाच्यावर जाण्याची शक्यता यंदा दिसत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. गुजरात सरकारने कापसाला ५०० रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर करावा, अशी मागणी राज्यातील शेतकºयांनी केली आहे.
सोयाबीनच्या भावाबाबतही अशीच परिस्थिती आहे. २०११ मध्ये सोयाबीनचा भाव ३२०० रुपये प्रति क्विंटल, २०१२ मध्ये ३४००, २०१३ मध्ये ३८०० तर २०१४ मध्ये ४००० रुपये प्रति क्विंटल भाव होता. तर यंदा २०१७ मध्ये हा भाव २९०० रुपयांवर पोहचले आहे. मधले दोन वर्ष अनुक्रमे शेतकºयांना २७०० व २४०० भाव मिळाला. सोयाबीन पिकाला येणारा खर्च पाहू जाता सोयाबीनचा भाव ही शेतकºयांना परवडणारा नाही. गेल्यावर्षी शासनाने तूर खरेदी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला. शेतकºयांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. तुरीचे २०११ मध्ये ३२०० रुपये होते. २०१२ मध्ये ३१००, २०१३ मघ्ये ३३००, २०१४ मध्ये ३२०० तर २०१५ मध्ये २७००, २०१६ मध्ये २५०० तर गत वर्षीही २२०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान तुरीला भाव मिळाला. हीच परिस्थिती अन्य पिकांच्याही बाबत आहे. ऊसाच्याही भावामध्ये शेतकरी विदर्भात नागविल्या जात आहे. एकूणच शासनाचे धोरण स्वत:च शेतमाल खरेदीचे नाही. खासगी बाजारातील व्यापाऱ्यांनी शेतकºयांचा शेतमाल खरेदी करावा, अशी व्यवस्था सरकारी यंत्रणेकडून गेल्या तीन वर्षापासून करण्यात येत आहे.
अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष
कापूस पणन महासंघाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १००० रूपये बोनस द्यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने विदर्भातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था लक्षात घेवून १ डिसेंबरपासून विधानसभेवर हल्लाबोल करण्यासाठी यवतमाळ येथून पदयात्रा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कापूस भाववाढीबाबत काही निर्णय होण्याची आशा आहे. त्यामुळे आगामी नागपूर अधिवेशनाकडे शेतकºयांचे लक्ष आहे.
वर्धा जिल्ह्यात काही बाजार समित्यांतर्गत कापसाला ४८०० ते ४९०० रूपये भाव दिला जात आहे. येथे व्यापाºयांमध्ये कापूस खरेदीची चुरस असल्याने ही परिस्थिती उद्भ्वली आहे. मात्र इतरत्र अशी परिस्थिती नाही. शेतकऱ्याच्या कापूस व सोयाबीनला अत्यल्प भाव दिला जात आहे. बाजारात शेतमाल नेल्यानंतर त्याला उतरविण्यापासूनचा सारा खर्च शेतकºयाला करावा लागत आहे. त्या तुलनेत यंदा भाव फार कमी आहे.

Web Title: Farmers worried about rushing farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस