महामार्गासाठी शेतजमीन जाणार असल्याच्या चर्चेने शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Published: July 24, 2016 12:21 AM2016-07-24T00:21:25+5:302016-07-24T00:21:25+5:30

नागपूर ते मुंबई हा जलदगती महामार्ग सेलू-वर्धा- आर्वी ते अमरावती जिल्ह्यातून धामणगाव मार्गे जाणार आहे.

Farmers worried over discussions about farmland going for the highway | महामार्गासाठी शेतजमीन जाणार असल्याच्या चर्चेने शेतकरी चिंताग्रस्त

महामार्गासाठी शेतजमीन जाणार असल्याच्या चर्चेने शेतकरी चिंताग्रस्त

Next

योग्य मोबदला गरजेचा : शेती गेल्यास रोजगाराचा प्रश्न
विरूळ (आकाजी) : नागपूर ते मुंबई हा जलदगती महामार्ग सेलू-वर्धा- आर्वी ते अमरावती जिल्ह्यातून धामणगाव मार्गे जाणार आहे. या महामार्गकरिता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची धडकी भरली आहे. परिणामी, शेतकरी आतापासूनच चिंतेत दिसताहेत.
धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचे शासनाने हाल केले आहेत. ही बाब आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलीच माहिती आहे. मग, महामार्गासाठी आपल्या जमिनी गेल्या व योग्य मोबदला मिळाला नाही तर धरणग्रस्त शेतकऱ्यांसारखे आपले हाल होतील, अशी भावना शेतकरी व्यक्त करतात. ‘नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील महामार्ग’ अशी नव्याने तयार होणाऱ्या मार्गाची ओळख असल्याची चर्चा आहे. नागपूर ते मुंबई ८ तासांत या महामार्गाने पोहोचता येणार आहे. हा मार्ग सहा पदरी राहणार आहे. जाण्यासाठी ३ लेंथ, येण्यासाठी ३ लेंथ महामार्गात राहणार आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूला तारांचे कुंपण असून ४० किमीच्या अंतरात कोणताही थांबा राहणार नाही. नागपूरातून निघणारा हा मार्ग सेलू, वर्धा, आर्वी व पूढे धामणगाव रेल्वे तालुक्यातून पूढे जाणार असल्याची माहिती आहे.
या मार्गासाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी जाणार असल्याची चर्चा आहे. जमिनी गेल्या तर काय होईल, या चिंतेने शेतकरी धास्तावले आहे. या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला तर ठिक, नाही तर धरणग्रस्तांप्रमाणे हाल होतील, अशी चर्चा आहे. शासनाने खरेदी केलेल्या जमिनीला चांगला मोबदला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे; पण शासनाचा पैसा वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)

याबाबत शासनातर्फे सध्या तरी कोणतीही परिपत्रक आले नाही. केवळ आर्वी तहसील अंतर्गत रस्ते विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या शेताचे सर्व्हे क्रमांक गोळा करण्यास सांगितले आहे.
- मनोहर मानकर, तलाठी, ग्रा.पं. विरूळ, सोरटा.

 

Web Title: Farmers worried over discussions about farmland going for the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.