सायखेडा (ठाकरे) येथे वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:58 PM2018-12-19T23:58:05+5:302018-12-19T23:59:21+5:30

नजीकच्या सायखेडा (ठाकरे) येथील शेत शिवारात रोही व जंगली श्वापदांचा प्रचंड हैदोस असून दररोज शेतातील तूर, कापूस, चणा व गव्हाच्या पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी सकाळी शेतात गेल्यावर दररोज नवीन नुकसान पाहून हताश नजरेने घरी येतात.

Farmers worry about wild animals in Sikheida (Thackeray) | सायखेडा (ठाकरे) येथे वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी चिंतेत

सायखेडा (ठाकरे) येथे वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी चिंतेत

Next
ठळक मुद्देपिकांची नासाडी : तक्रार व पंचनामे करून शेतकरी व वन विभागाचे कर्मचारी थकले

लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : नजीकच्या सायखेडा (ठाकरे) येथील शेत शिवारात रोही व जंगली श्वापदांचा प्रचंड हैदोस असून दररोज शेतातील तूर, कापूस, चणा व गव्हाच्या पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी सकाळी शेतात गेल्यावर दररोज नवीन नुकसान पाहून हताश नजरेने घरी येतात. दररोजच्या नुकसानाचे किती प्रस्ताव वनविभागाकडे सादर करावेत हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तर दररोज किती शेतकºयांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करावेत हा प्रश्न वनविभागातील कर्मचाºयासमोर निर्माण झाला आहे.
सायखेडा (ठाकरे) हे गाव वर्धा नदीकाठावर असून त्यांची शेतजमीन त्याच परिसरात आहे. धाखटी व उपजाऊ जमीन म्हणून हा भाग प्रसिध्द आहे. या जमिनीतील पिकांची उलंगवाडी लवकर होत नाही. यावर्षी इतर भागातील पिकांची उलंगवाडी होत असली तरी या परिसरातील पिके अजूनही भरीत आहेत. पिण्यासाठी पाणी व लपण्यासाठी नदी किनारी खोल दºया असल्याने जंगली श्वापदे व रोही या परिसरात स्थान मांडून आहे. दिवसभर लपून बसून रात्रीच्यावेळी ही श्वापदे पिकांवर ताव मारतात यात ते खाते कमी व नासाडी जास्त करतात. काही दिवसांपूर्वी बिबट्याने गाईवर हल्ला करून गार्इंना जखमी केल्याची घटना घडल्यापासून शेतकरी रात्री पिकांची रखवाली करण्यास जाण्यासाठी घाबरतात. सध्या कापूस, तूर, चणा व गहू ही पीके शेतात असून श्वापदे दररोज पिकांची नासाडी करीत आहे. या शिवारात फेरफटका मारला असता प्रत्येक शेतात पिकांचे नुकसान आढळते. या गावात ठाकरे कुटूंबियांची संख्या अधिक असून श्रीधर ठाकरे, गजानन ठाकरे, रमेश ठाकरे, सुरेश ठाकरे, भाष्कर ठाकरे, गणेश ठाकरे, रामरावजी महात्मे या शेतकºयांनी पिकांच्या नुकसाबद्दल व्यथा मांडून दररोज वनविभागाकडे किती प्रस्ताव सादर करावे. शेतीची कामे करावी की प्रस्तावासाठी कागदपत्रे गोळा करण्यात वेळ खर्ची घालावा असा प्रश्न उपस्थित केला. समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढल्याशिवाय शेतकºयांच्या व्यथा थांबणार नाहीत हे मात्र वास्तव आहे.
कन्नमवारग्राम येथे पिकांची नासाडी
कन्नमवारग्राम- येथील वृत्तपत्र विक्रेता श्रीकांत देविदास धुर्वे यांच्या मालकीचे शेत हेटी शिवारात आहे. हा भाग जंगलव्याप्त असल्यामुळे बारमाही या भागात वन्यप्राण्याच्या हैदोस आहे. शेतकºयांनी ज्वारी, कपाशी, तूर, सोयाबीन पेरले पण अचानकपणे दसºया पासून या परिसरात सर्वत्र वाघाचे दर्शन गावकºयांना होवू लागले. तर कुणाची गाय कुणाची म्हैस मारल्याचे दिसू लागले. त्यामुळे या गावातील व परिसरातील शेतकºयांनी जागली जाणे बंद केले. त्यामुळे डुकरे, रोही, हरण यांनी शेतकºयांची पºहाटी व तूर राजरोसपणे फस्त करणे सुरू केले. त्याच प्रमाणे याही शेतकºयाच्या जवळपास ५-६ एकर शेतातील तूर व कापूस पिकाचे नुकसान केले. त्यामुळे परिपक्व पिकाचे नुकसान जवळपास शेतकºयाचे ६०-७० हजार रूपयेच झाले आहे. वनविभागाला शेतकºयाने माहिती, कागदपत्रानिशी दिली आहे. तरी शेतकºयांनी वनविभागाने चौकशी करून योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. वन्यजीवाच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

Web Title: Farmers worry about wild animals in Sikheida (Thackeray)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.