उपोषणकर्त्यांनी केले ग्रामपंचायतीसमोर मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:23 PM2018-01-28T23:23:38+5:302018-01-28T23:24:01+5:30
आठवडी बाजारातील मटन मार्केट हटविण्याच्या मागणीसाठी जनयुवा मंचद्वारे शनिवारपासून ग्रा.पं. कार्यालय मार्गावर उपोषण सुरू करण्यात आले आहे. रविवारी ग्रा.पं. कार्यालयासमोर आंदोलनाचाच एक भाग म्हणून मुंडण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : आठवडी बाजारातील मटन मार्केट हटविण्याच्या मागणीसाठी जनयुवा मंचद्वारे शनिवारपासून ग्रा.पं. कार्यालय मार्गावर उपोषण सुरू करण्यात आले आहे. रविवारी ग्रा.पं. कार्यालयासमोर आंदोलनाचाच एक भाग म्हणून मुंडण करण्यात आले.
जनयुवा मंचचे अध्यक्ष योगेश वरभे व शिवसेनेचे अल्लीपूर सर्कल प्रमुख तथा ग्रा.पं. सदस्य गोपाल मेघरे हे उपोषणाला बसले. उपोषणाच्या दुसºया दिवशीही ग्रा.प.ने प्रतिसाद न दिल्याने रविवारी मुंडण आंदोलन केले. ग्रा.पं. कार्यालयासमोर वरभे व मेघरे यांनी मुंडण करून ग्रा.पं. प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी जनयुवा मंचचे पदाधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
रविवारी शिवसेनेद्वारे ग्रा.पं. ला निवेदन देण्यात आले. यात उपोषणकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असून निर्णय लांबल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. उद्भवणाºया परिस्थितीस ग्रा.पं. प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.