सरसकट कर्जमाफीसाठी शेतकºयांचा उपवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:44 AM2017-09-04T00:44:43+5:302017-09-04T00:46:32+5:30
शासनाची कर्जमाफी फसवी असून विविध जाचक अटी शेतकºयांच्या अडचणी वाढविणाºयाच आहेत. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, ......
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाची कर्जमाफी फसवी असून विविध जाचक अटी शेतकºयांच्या अडचणी वाढविणाºयाच आहेत. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी रविवारी शरद जोशी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकºयांनी एकदिवसीय उपवास केला.
शेतकºयांवरील सर्व प्रकारचे कर्ज विना अट तात्काळ माफ करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा. आस्मानी व सुलतानी संकटांनी शेतकरी हवालदिल झाला असून शेतकºयांवर थकीत असलेले संपूर्ण विद्युत देयक त्वरित माफ करण्यात यावे. शेतीमालाचे निर्यात शुल्क वाढवणे, नियार्तीवर बंदी अथवा निर्र्बंध लादणे, चढ्या दराने परदेशातून शेतमालाची आयात करणे, आंतरराज्य वाहतुकीवर बंदी घालणे, व्यापारी साठ्यांवर मर्यादा घालणे, विक्री किंमतीवर मर्यादा घालणे आदी उपाय कायमस्वरूपी बंद करावे. शेतीला जाचक ठरणारे कायदे रद्द करावे. तसेच शरद जोशी प्रणीत मार्शल प्लान (भारत उत्थान कार्यक्रम) शेतकºयांच्या हितार्थ लागू करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी भजनातून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला.
या आंदोलनाचे नेतृत्त्व गंगाधर मुटे, शैलेजा देशपांडे, मधुसूदन हरणे, प्रा. मधुकर झोटींग, सचिन डाफे, गजानन निकम यांनी केले. आंदोलनात रवी काशीकर यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.