Accident: ‘समृद्धी’वर भीषण अपघात; ट्रकला धडकून पोलिस वाहन चक्काचूर महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू : तीन कर्मचाऱ्यांसह आरोपी गंभीर जखमी

By चैतन्य जोशी | Published: April 29, 2023 11:58 AM2023-04-29T11:58:30+5:302023-04-29T11:58:43+5:30

Accident on Samruddhi Mahamarg: परभणी येथून आरोपी घेऊन नागपूर येथे जाणारे पोलिस वाहन ट्रकला मागून धडकल्याने भीषण अपघात झाला. २९ रोजी समृद्धी महामार्गावर पांढरकवढा गावानजीक सकाळी ६.३० ते ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

Fatal accident on 'Samruddhi Highway'; Woman police inspector killed after police vehicle collided with truck : Accused seriously injured along with three employees | Accident: ‘समृद्धी’वर भीषण अपघात; ट्रकला धडकून पोलिस वाहन चक्काचूर महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू : तीन कर्मचाऱ्यांसह आरोपी गंभीर जखमी

Accident: ‘समृद्धी’वर भीषण अपघात; ट्रकला धडकून पोलिस वाहन चक्काचूर महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू : तीन कर्मचाऱ्यांसह आरोपी गंभीर जखमी

googlenewsNext

- चैतन्य जोशी

वर्धा : परभणी येथून आरोपी घेऊन नागपूर येथे जाणारे पोलिस वाहन ट्रकला मागून धडकल्याने भीषण अपघात झाला. २९ रोजी समृद्धी महामार्गावर पांढरकवढा गावानजीक सकाळी ६.३० ते ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. अपघातात महिला पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचारी आणि आरोपी गंभीर जखमी झाले. पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण असे मृतकाचे नाव आहे. तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह, मिठ्ठू जगडा, चालक शम्मी कुमार आणि आरोपी वैद्यनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, हरयाणा येथील पंचकुला पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण आणि त्यांचे तीन कर्मचारी परभणी येथून फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी वैद्यनाथ शिंदे याला घेऊन एचआर. ०३ जी.व्ही. १७८२ क्रमांकाच्या बोलेरो पोलिस वाहनाने नागपूरकडे जात होते. समृद्धी महामार्गाने जात असताना पांढरकवडा गाव परिसरात पोलिस वाहन समोरील एम.एच. १७ बी.झेड. ६५७७ क्रमांकाच्या ट्रकला मागाहून धडकले. या भीषण अपघातात पोलिस वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. या अपघातात पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर पोलिस कर्मचारी व आरोपी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक, संदीप खरात हे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाले. तसेच जाम महामार्ग पोलिसही अपघातस्थळी दाखल झाले. सर्व जखमींना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तसेच आरोपी ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली.

पीस्टलसह १५ राऊंड ताब्यात
सावंगी पोलिसांनी अपघातग्रस्त पोलिस वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्याकडे असलेली १ ग्लॉक ९ एमएम पीस्टल आणि १५ राऊंड सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली.

Web Title: Fatal accident on 'Samruddhi Highway'; Woman police inspector killed after police vehicle collided with truck : Accused seriously injured along with three employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.