जावयाला द्यावा लागला सासऱ्याच्या घराचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 06:00 AM2019-10-03T06:00:00+5:302019-10-03T06:00:19+5:30

दशरथ उगेमुगे हे मुळचे चितोडा येथील रहिवासी असून त्यांचे जावयांशी संबंध चांगले असल्यामुळे बोरगाव येथील घरातील तीन खोल्या त्यांनी मुलगी नंदा शेंडे यांना दिल्या होत्या. तर उर्वरित तीन खोल्या जावई बाबाराव शेंडे यांना वापरण्याकरिता दिल्या होत्या.

The father-in-law had to take possession of the house | जावयाला द्यावा लागला सासऱ्याच्या घराचा ताबा

जावयाला द्यावा लागला सासऱ्याच्या घराचा ताबा

Next
ठळक मुद्देन्यायालयाचा निकाल: पोलिसांची मध्यस्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतच्या बोरगाव (मेघे) येथील गणेश नगरात दशरथ उगेमुगे यांचे घर आहे. या घरातील तीन खोल्या त्यांनी मुलगी नंदा बाबाराव शेंडे व तीन खोल्या बाबाराव शेंडे यांना दिल्या होत्या. पण, मुलीच्या निधनानंतर जावई बाबाराव शेंडे यांनी या खोल्या परत करण्याऐवजी त्यावर ताबा मिळविला होता. त्यामुळे न्यायालयात प्रकरण पोहोचल्यावर सासऱ्याच्या बाजुनेच निकाल लागल्याने जावयाला नाईलाजास्तव सासऱ्याला खोल्या परत कराव्या लागल्यात.
दशरथ उगेमुगे हे मुळचे चितोडा येथील रहिवासी असून त्यांचे जावयांशी संबंध चांगले असल्यामुळे बोरगाव येथील घरातील तीन खोल्या त्यांनी मुलगी नंदा शेंडे यांना दिल्या होत्या. तर उर्वरित तीन खोल्या जावई बाबाराव शेंडे यांना वापरण्याकरिता दिल्या होत्या.
दरम्यान मुलगी नंदा यांचा मृत्यू झाल्याने बाबाराव शेंडे यांनी उगेमुगे यांना खोल्या परत न करता त्यांच्याच विरुद्ध नायालयात दोन प्रकरण दाखल केले. त्यामुळे उगेमुगे यांनीही घराचा ताबा मिळण्याकरिता न्यायालयात धाव घेतली. कनिष्ठ न्यायालयाने उगेमुगे यांच्या बाजुने निकाल दिला. या निकालाच्या विरुद्ध शेंडे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापर्यंत अपील केली परंतु तेथेही अपयश आले.
तरीही शेंडे यांनी घराचा ताबा देण्यासाठी टाळाटाळ केली. शेवटी उगेमुगे यांनी बाबाराव शेडे व त्यांच्या मुलाला तुरुंगात टाकण्याबाबत दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावरुन शेंडे यांनी घराचा ताबा देण्यास तयार असल्याचे न्यायालयाला लेखी दिले. शेवटी पोलीस बंदोबस्तात दशरथ उगेमुगे यांना घराचा ताबा देण्यात आला.

Web Title: The father-in-law had to take possession of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.