महावितरणच्या शुल्क वाढीमुळे वीज ग्राहकांत संताप

By admin | Published: June 10, 2015 02:15 AM2015-06-10T02:15:06+5:302015-06-10T02:15:06+5:30

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीसह वीज वितरणने घरगुती ग्राहकांसह व्यापारी ग्राहकांना शुल्कवाढीचा शॉकच दिला आहे.

Fear of electricity consumers due to increase in MSEDCL | महावितरणच्या शुल्क वाढीमुळे वीज ग्राहकांत संताप

महावितरणच्या शुल्क वाढीमुळे वीज ग्राहकांत संताप

Next

वर्धा : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीसह वीज वितरणने घरगुती ग्राहकांसह व्यापारी ग्राहकांना शुल्कवाढीचा शॉकच दिला आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या वीज शुल्कात एक टक्का वाढ करण्यात आली आहे. यामुळे बिलाच्या रकमेतही वाढ होणार आहे.
पूर्वी विद्युत शुल्क १५ टक्के होते ते आता १६ टक्के करण्यात आले आहे. याचवेळी व्यापारी ग्राहकांचे वीजबिल चार टक्क्यांनी वाढणार आहे. घरगुती ग्राहकांना जर ५०० रुपये बिल द्यावे लागत असेल तर यानंतर ५०५ रुपये द्यावे लागेल. २००० रुपेय बिल येणाऱ्यांना २०२० रुपये तर एक हजार रुपये बिल देणाऱ्यांना यापूढे एक हजार १० रुपये बिल द्यावे लागणार आहे. अर्थसंकल्पातील करवाढीची अंमलबजावणी याच महिन्यापासून केली जाणार आहे. शिवाय राज्यात सात हजार ५०० सौर कृषिपंप बसविले जाणार आहे. या योजनेला निधी पुरविण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील वीजदरात एक टक्के वाढ केली जाणार आहे. ही वाढ प्रतियुनिट एक पैसा एवढी राहणार आहे. व्यापारी वीज ग्राहकांना चार टक्क्यांनी वीज वाढीला सामोरे जावे लागणार आहे. ही शुल्कवाढ आकस्मिक केल्याची चर्चा होती. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होतोय.(कार्यालय प्रतिनिधी)
इमरजंसीच्या नावाखाली होतेय भारनियमन; शेतकरी त्रस्त
सेलू : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना वीज वितरणच्या तुघलकी कारभाराचा फटका बसत आहे. वीज पुरवठ्यात आलेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. घोराड हे गाव पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येचे असून बागायती शेतीचे क्षेत्र आहे. या गावाला तीन लाईनमन वीज वितरणाचा कारभार पाहत होते. यापैकी एक सेवानिवृत्त झाले असून उर्वरित दोनपैकी एक आजारी असल्याच्या कारणाने दीर्घ रजेवर असल्याने एका लाईनमनच्या भरवशावर गाव व कृषी पंपाची जबाबदारी आली आहे.
गत काही दिवसांपासून वारा, वादळामुळे कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत नसल्याने रोहिणी नक्षत्रात कपाशीची लागवड करणारे शेतकरी व केळी बागायतदारांपूढे नवीन संकट उभे ठाकले आहे. ओलिताचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. गावातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यास रात्र अंधारात काढावी लागते. शेतातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवसागणिक प्रतीक्षा नित्याचीच झाली आहे. त्यातच घोराड कार्यालयाच्या अभियंत्यांची बदली नागपूरला झाल्याचे वृत्त आहे. यामुळे घोराड गावच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी एक लाईनमन कशी सांभाळणार, हा संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे. इमरजंसीच्या नावावर भारनयिमन करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. यासाठी घोराड येथे लाईनमन देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांसह केळी उत्पादक व शेतकऱ्यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Fear of electricity consumers due to increase in MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.