केरळ पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या सामाजिक संघटनांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:38 PM2018-09-11T23:38:22+5:302018-09-11T23:39:04+5:30

अखिल भारतीय सर्वधर्म कौमी एकता समितीच्यावतीने सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या चमूला सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार मातोश्री वृध्दाश्रमात नुकताच करण्यात आला.

Felicitations of social organizations supporting Kerala flood victims | केरळ पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या सामाजिक संघटनांचा सत्कार

केरळ पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या सामाजिक संघटनांचा सत्कार

Next
ठळक मुद्देसर्वधर्म कौमी एकता समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अखिल भारतीय सर्वधर्म कौमी एकता समितीच्यावतीने सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या चमूला सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार मातोश्री वृध्दाश्रमात नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे होते. प्रमुख अतिथी म्हणून वर्धेचे ठाणेदार चंद्रकांत मदने, सावंगीचे ठाणेदार दत्तात्रय गुरव, रामनगरचे ठाणेदार चौधरी, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बारई, विशाल कोसे, युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, डॉ. अमित कुमार आदी उपस्थित होते.
केरळ पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेची चमू बारा दिवस केरळ राज्यात गेली होती. या चमूला औषध व रोख आर्थिक मदत वर्धा शहरातील सामाजिक संघटनांनी केली. या संघटनांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये वर्धा जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, वर्धा, सावंगी, रामनगर, स्थानिक गुन्हे शाखा यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, युवा सोशल फोरम, मिलिंद गांधी, अंकुर जैन व व्यापारी मित्र यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कौमी एकता समिती अध्यक्ष गुड्डु अली, गिरीष चवडे, मिलिंद गांधी, अ‍ॅड. असद खान, आबिद खान, गुड्डु पठाण, सलामभाई, अनमद, बाबा जाकीर, वैशाली नगराळे, इंगोले, गुंफा आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. पावडे म्हणाले की देवाच्या नंतर सर्वसामान्य लोकांना डॉक्टरवर सर्व विश्वास असतो. नागरिकांनी सुध्दा जनसेवेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. हे त्यांचे कर्तव्य आहे, असे विचार मांडले. यावेळी मदने यांनी पोलीस प्रशासन अशा सामाजिक कार्यात तत्परतेने मदत देण्यासाठी सदैव पुढाकार घेईल, असे सांगितले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Felicitations of social organizations supporting Kerala flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.