ब्राह्मणवाडा जंगल परिसरात आढळला वाघिणीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 05:08 PM2021-02-09T17:08:49+5:302021-02-09T17:09:08+5:30

क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याचा प्रार्थमिक अंदाज

female tiger body was found in Brahmanwada forest area | ब्राह्मणवाडा जंगल परिसरात आढळला वाघिणीचा मृतदेह

ब्राह्मणवाडा जंगल परिसरात आढळला वाघिणीचा मृतदेह

Next

वर्धा : आर्वी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या ब्राह्मणवाडा बीटाचा एक भाग असलेल्या तुल्हाणा भागातील पांझरा (गोंडी) जंगल परिसरात एका वाघिणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून शवविच्छेदनाअंती मृत वाघिणीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.


पांझरा गाेंडी (जंगल) परिसरात वाघिण मृतावस्थत पडून असल्याची माहिती मिळताच वनविभागाचे ठाकूर, आर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव, बीट रक्षक डेहनकर, वन्यजीव प्रेमी कौशल मिश्रा, संजय इंगळे तिगावकर यांनी घटनास्थळ गाठून वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंधारे, डॉ. पाटील यांना पाचारण करण्यात आले. तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने मृत वाघिणीचे शवविच्छेदन केले. मृत वाघिण ही ४ ते ५ वयोगटातील असून क्षयरोगामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. असे असले तरी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वाघिणीचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे.



मृत वाघिण बोर मधील की पाहूणी?
सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील बहूतांश वाघ अन्न व पाण्याच्या शोधार्थ प्रादेशिकच्या जंगलाकडे जातात. विशेष म्हणजे प्रादेशिकच्या कार्यक्षेत्रात मुक्त संचार करणाऱ्या वाघांना कुठलाही नंबरींंग दिली जात नाही. ब्राह्मणवाडा नजीकच्या पांझरा (गोंडी) जंगल परिसरात मृतावस्थेत सापडलेली वाघिण ही बोर व्याघ्र प्रकल्पातील की पाहूणी याचा शोध सध्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे.

Web Title: female tiger body was found in Brahmanwada forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ