प्रहारने केली सातबाराची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:22 PM2017-12-08T23:22:44+5:302017-12-08T23:23:30+5:30

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

The festival celebrated Holi | प्रहारने केली सातबाराची होळी

प्रहारने केली सातबाराची होळी

Next
ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोरील आंदोलन : शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याची मागणी

आॅनलाईन लोकमत
वर्धा : शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या जनसामान्य विरोधी धोरणांच्या निषेधार्थ जिल्हाकचेरीसमोर सातबाराची होळी केली.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली;पण अंमलबजावणी झाली नाही. त्यातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर व संत्रा पिकाचे मोठे नुकसान केले. या संकटातून सावरण्यापूर्वीच बोंडअळीने कपाशी उत्पादकांच्या अडचणी वाढविल्या आहेत. बोंडअळीमुळे उत्पादनातही घट येण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यासर्व संकटामुळे शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा. बोंडअळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विनाअट एकरी २५ हजार रूपयाची शासकीय मदत द्यावी. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १ लाखाची मदत द्यावी. शिवाय कृषीपंपाचे विद्युत देयक माफ करून शेतकºयांना २४ तास विद्युत पुरवठा करावा. सोयाबीन व तूर उत्पादक शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रूपयाचे अनुदान द्यावे. स्वामिनाथन आयोग लागू करावा. पेरणी ते कापणीपर्यंत शेतीची सर्व कामे रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात यावी, आदी मागण्या निवेदनातून प्रहार जनशक्ती पक्षाच्यातर्फे आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली आहे. आंदोलनात गजू कुबडे, देवा धोटे, राजू बोभाटे, आदित्य कोकटवार, प्रमोद कुऱ्हटकर, हनुमंत झोटींग, विकास दांडगे, मिलिंद गोमासे, अंकीत दांडेकर, प्रमोद मस्के, अमोल येंडे, रूपराज भगत, बिट्टू रावेकर, राजू सावरकर, सोनू काजी, शैलेश सहारे, महेश साहू, खोंडे, रजत डंभारे, भोयर, लोहभवरे, वैद्य आदी सहभागी झाले होते.

Web Title: The festival celebrated Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.