कारंजातून पूजा सपकाळ प्रथम

By admin | Published: May 28, 2015 01:42 AM2015-05-28T01:42:17+5:302015-05-28T01:42:17+5:30

तालुक्यातुन एकूण ८१३ विद्यार्थ्यांनी बाराव्या वर्गाची परीक्षा दिली. बुधवारी जाहीर झालेल्या निकालात ६७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Festive worship first from Karanja | कारंजातून पूजा सपकाळ प्रथम

कारंजातून पूजा सपकाळ प्रथम

Next

कारंजा (घा.) : तालुक्यातुन एकूण ८१३ विद्यार्थ्यांनी बाराव्या वर्गाची परीक्षा दिली. बुधवारी जाहीर झालेल्या निकालात ६७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील विविध शाळांनी एकूण ८२ टक्के निकाल लागला आहे. बांगडापूर येथील मातोश्री लक्ष्मीबाई व्यवहारे विद्यालयाची पुजा सपकाळ ही ८४ टक्के गुण घेत तालुक्यातुन प्रथम आली आहे.
तालुक्यातील एकूण आठ शाळांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय ८२.०५ टक्के निकाल लागला असुन कला शाखेची सोनल गोरेने ७७.५३ टक्के गुण प्राप्त करीत शाळेतुन प्रथम येण्याचा मान पटकाविला. स्वाती मनोहर बारंगे ७४.७६ टक्के गुण प्राप्त करुन व्दितीय आली. व.राजीव गांधी मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा ८८ टक्के निकाल लागला. कस्तुरबा विद्यालयाचा ९८.२७ टक्के निकाल लागला असून निकीता कातलाम ७२ टक्के गुण घेवून प्रथम, राकेश धुर्वे ७१.५३ टक्के व्दितीय तर रोशन पोहनकर ७१.३८ टक्के गुण घेवुन तृतीय आला. नवप्रभात विद्यामंदीर ठाणेगांव ७५ टक्के, पी.एन.बेले कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ४५ टक्के लागला. सर्वच शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतून गुणपत्रिका नेण्याच्या सूचना केल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Festive worship first from Karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.