सोयाबीनचे कुटार ठरतेय शेतकऱ्यांना घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:04 PM2018-03-22T22:04:58+5:302018-03-22T22:04:58+5:30

खरीप हंगामात सोयाबीनने दगा दिला. उत्पन्न घटल्याने नैराश्य आले. यानंतर कपाशीवरही बोंडअळीने हल्ला केल्याने नुकसान सोसावे लागले.

Fierce farmers are considered dangerous for soybean cultivation | सोयाबीनचे कुटार ठरतेय शेतकऱ्यांना घातक

सोयाबीनचे कुटार ठरतेय शेतकऱ्यांना घातक

Next
ठळक मुद्देघरामध्ये झाल्या अळ्या : उघड्यावर स्वयंपाक व जेवण करण्याची वेळ

ऑनलाईन लोकमत
विरूळ (आकाजी) : खरीप हंगामात सोयाबीनने दगा दिला. उत्पन्न घटल्याने नैराश्य आले. यानंतर कपाशीवरही बोंडअळीने हल्ला केल्याने नुकसान सोसावे लागले. किमान कुटारातून आर्थिक नुकसान कमी करता येऊ शकेल म्हणून शेतकऱ्यांनी ते जपून ठेवले; पण ते कुटारही शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आहे. कुटारामुळे घरात अळ्या झाल्याने उघड्यावर स्वयंपाक व जेवण करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
गावातील वासुदेव चाफले यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीनचे कुटार शेजारी रामदास खेलकर यांच्या भिंतीलगत ठेवले होते. हे कुटार गुरांना खाद्य म्हणून उपयोगी पडेल म्हणून ठेवले होते; पण काहीच दिवसांत त्या कुटारात अळ्या, उडदे झाले आहेत. या कुटारातील उळ्या खेलकर यांच्या घरात सर्वत्र पसरल्या आहेत. या अळ्या जेवणात, पाण्यात पडत असल्याने कुटुंबीय त्रस्त आहे.

Web Title: Fierce farmers are considered dangerous for soybean cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.