वृक्षारोपणावर भर, संवर्धन ‘बॅकफुट’वर

By admin | Published: August 29, 2016 12:40 AM2016-08-29T00:40:30+5:302016-08-29T00:40:30+5:30

निसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे.

Filled on the tree, on culture 'backfoot' | वृक्षारोपणावर भर, संवर्धन ‘बॅकफुट’वर

वृक्षारोपणावर भर, संवर्धन ‘बॅकफुट’वर

Next

अहवाल कागदोपत्रीच : रोहयोंतर्गत ९.४२ लाख रोपांची लागवड
गौरव देशमुख वर्धा
निसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊनच शासनाद्वारे शतकोटी वृक्ष लागवड उपक्रम हाती घेण्यात आला. शिवाय गावोगावी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी आवाहन केले जाते; पण झाडे लावल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे वास्तव आहे. उन्हाळा आला की, कोवळी झाडे करपत असल्याने वृक्ष लागवडीवरील खर्च व्यर्थ ठरत आहे.
२०१२-१३ ते २०१५-१६ या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत, कृषी विभागामार्फत १०० टक्के वृक्ष लागवड करण्यात आली; पण संवर्धनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळ्यात वृक्ष लागवडीला उधान येते; पण उन्हाळा सुरू होताच वृक्षांचा विसर पडतो. त्या रोपट्यांचे संवर्धन करण्याची गरज कुणालाही वाटत नाही. प्रशासनाच्या बाबतीतही हिच बाब समोर येत आहे.
वर्धा जिल्ह्यात २०१२ ते १५ दरम्यान ७ लाख २९ हजार ८९१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यात २०१२-१३ मध्ये ७७ हजार २०४, २०१३-१४ मध्ये १ लाख ७३ हजार २२८ तर २०१४-१५ मध्ये २ लाख ९९ हजार ७ वृक्षांची लागवड करण्यात आली. मार्च २०१५ पर्यंत १ लाख ८० हजार ४५२ वृक्षांची लागवड झाली; पण यात किती झाडे जगली, किती करपली याबाबत नक्की माहिती उपलब्ध नाही. कागदोपत्री मात्र सर्व रोपटी जगल्याचीच नोेंद असल्याचे दिसू येत आहे.
यावर्षी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यंत्रणानिहाय वृक्ष लागवड करण्यात आली. यात गटविकास अधिकारी पं.स. (सर्व) १ लाख ६५ हजार १६६, कार्यकारी अभियंता लघु सिंचन (वर्धा, हिंगणघाट, आर्वी) ४ हजार ५००, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जि.प. वर्धा २ हजार ३०, शिक्षण विभाग माध्य. १० हजार ३९६, शिक्षण विभाग प्राथमिक २५ हजार ७८, पशुसंवर्धन विभाग १ हजार ७९८, जिल्हा आरोग्य अधिकारी २ हजार ८०० तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या जि.प. यंत्रणेनिहाय २ लाख १२ हजार २३८ वृक्षांची लागवड करण्यात आली; पण यापैकी १० टक्के रोपटी तरी जगतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या वृक्षांच्या संवर्धनाकडे कितपत लक्ष दिले जाते, हा प्रश्नच असून याचा विचार होणे गरजेचे आहे.

Web Title: Filled on the tree, on culture 'backfoot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.