परमधाम आश्रमात मित्र मिलन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 06:00 AM2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:00:20+5:30

विनोबांचे हे १२५ वे जयंती पर्व असल्याने यावर्षीच्या मित्र मिलन सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या मित्र मिलन सोहळ्यास काश्मीर ते कन्याकुमारीपासून १५१ जय जगत मैत्री यात्रा येणार असून या माध्यमातून विविधतेतून एकतेचे दर्शन घडणार आहे. सोहळ्याचे मुख्य आकर्षण पूज्य श्री मुरारी बापू, स्वामी सामदोंग रिन्पोछे, स्वामी चिदानंद सरस्वती हे असून या सत्रात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

The final phase of preparation for the Friends Meeting ceremony at Paradham Ashram | परमधाम आश्रमात मित्र मिलन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

परमधाम आश्रमात मित्र मिलन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

Next
ठळक मुद्देदेशभरातून प्रतिनिधी होणार सहभागी : विविध क्षेत्रातील मान्यवरांची कार्यक्रमाला राहणार हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ वी जयंती पर्व व ३८ वा ब्रह्मनिर्वाण सोहळा १५, १६ व १७ नोव्हेंबरला ब्रह्म विद्या मंदिर परमधाम आश्रम, पवनार येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात देशभरातून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यासाठीची तयारी अंतीमटप्प्यात आली आहे.
शुक्रवार १५ रोजी पहाटे ४ ते ५ वाजता जागरण, प्रार्थना, जय जगत समाधी प्रदक्षिणा, सकाळी ९ ते १०.३० स्तुती भजन, श्रद्धांजली, स्वागत व संमेलनाची रूपरेखा शाली बहन सादर करतील. ११ ते १२.३० दरम्यान श्री बाल विजयजी यांचे प्रबोधन, संपूर्ण विनोबा या विषयावर पराग भार्इंचे विचार पुष्प, विनोबा, सत्याग्रह या विषयावर बिहार विद्यापिठाचे माजी कुलगुरू सुदर्शन अटांगार यांचे अनुभव, पुस्तका प्रकाशन व १२५ व्या जयंती पर्वावर मित्र मिलनाचा विस्तार रमेश भाई (शहाजहारपूर) हे करतील. तर दुपारच्या सत्रात विनोबा, भूदान, ग्रामदान, ग्राम स्वराज्य, बागी समर्पण, शांती सेना या विषयावर एस. एन. सुब्बाराव, राम सिंदजी (बिहार), शंकर सान्याल (हरिजन सेवा मंडळ दिल्ली), पी.व्ही. राजगोपाल (जय जगत यात्रा प्रमुख, तपरेश्वर भाई (भूदान चळवळ, बिहार), सुभाष शर्मा (जैविक शेती प्रणेते), डॉ. विभा गुप्ता वर्धा, करूणा बहन (ब्रह्म विद्या मंदिर), आदित्य पटनाईक (ओरीसा), प्रोफेसर पुष्पेंद्र दुबे (इंदौर), लक्ष्मीदास भाई (उपाध्यक्ष हरिजन सेवक संघ दिल्ली) हे विचार व्यक्त करतील. शनिवार १६ रोजी सोहळ्याचे मुख्य आकर्षण पूज्य मुरारी बापू असून ते विनोबा विचारावर प्रवचन करतील. गौतम बजाज (ब्रह्म विद्या मंदिर), उच्च न्यायालय मुंबईचे न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी हेही विचार मांडणार आहेत. तर दुपारच्या सत्रात पुज्य विनोबा व सर्वोदय विचार कार्य, अनुभव या विषयावर जोत्सना बहन, मिलिंद बोकील, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची कन्या अनार बहर पटेल, अमिला बहन (उ.प्र.), प्रोफेसर गिता मेहता, सुप्रिया पाठक, अमरनाथ भाई, राजेंद्रसिंहजी (जलतज्ञ), मोहनभाई (लेखा मेंढा) हे मार्गदर्शन करणार आहेत. तर १७ रोजी प्रथम सत्रात उषा बहन सत्संग प्रवचन करतील तर विनोबा, साम्ययोग, शिक्षण विचार, सर्वधर्म समभाव, अध्यात्मक विज्ञान या विषयावर कंचन बहन (ब्रह्म विद्या मंदिर), स्वामी रामदोंग (रेन्पोछेजी माजी पंतप्रधान तिबेट तथा सारनाथ विद्यापीठाचे उपकुलगुरू), स्वामी चिदानन्द सरस्वतीजी (परमार्थ निकेतन ऋषीकेश), हेमभाई मार्गदर्शन करतील.

जय जगत मैत्री यात्रेतून घडणार विविधतेतून एकतेचे दर्शन
विनोबांचे हे १२५ वे जयंती पर्व असल्याने यावर्षीच्या मित्र मिलन सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या मित्र मिलन सोहळ्यास काश्मीर ते कन्याकुमारीपासून १५१ जय जगत मैत्री यात्रा येणार असून या माध्यमातून विविधतेतून एकतेचे दर्शन घडणार आहे. सोहळ्याचे मुख्य आकर्षण पूज्य श्री मुरारी बापू, स्वामी सामदोंग रिन्पोछे, स्वामी चिदानंद सरस्वती हे असून या सत्रात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शहाजहानपूर वरून आपल्या चमूसह आलेले रमेशभाई हे पाहुण्यांची भोजन व्यवस्था पाहात असून जय जगत मैत्री यात्रेचे संपूर्ण नियोजन रमेशभाईनी केल्याचे ज्योती बहन यांनी सांगितले. जय जगत मैत्री यात्रा १४ रोजी सकाळी १० वाजता पवनारात दाखल होणार आहे. या यात्रेचे ग्रा.पं.च्यावतीने स्वागत केले जाणार आहे.

Web Title: The final phase of preparation for the Friends Meeting ceremony at Paradham Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.