अखेर वर्धा ते देवळी मार्गावर रेल्वे धावली; रेल्वे प्रशासनाने केली या मार्गाची तांत्रिक तपासणी
By अभिनय खोपडे | Published: August 31, 2023 05:15 PM2023-08-31T17:15:10+5:302023-08-31T17:18:01+5:30
देवळी स्टेशनवर नागरिकांची गर्दी
देवळी(वर्धा) : वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा म्हणून वर्धा ते देवळी मार्गाची तांत्रिक तपासणी गुरुवारी करण्यात आली.शिवाय या मार्गावर दोन इंजिनसहित आठ डब्यांच्या रेल्वे गाडीची प्रति घंटा ११० किमी वेगाने ट्रायल घेण्यात आली. यावेळी रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मशीन च्या माध्यमातून रेल्वे मार्गाने अवलोकन केले.
गाडीचे लोको पायलट(ड्रायव्हर)म्हणून गजानन रोडे यांनी भूमिका बजावली. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने दोन दिवसाआधीच याबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती. शिवाय या रेल्वे ट्रॅक पासून गुरे, ढोरे दूर ठेवण्याचे सांगितले होते. देवळीच्या रेल्वे स्टेशन वर रेल्वे गाडी आल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी, डीआएम तुषारकांत पांडे, एओएम चौथानी, स्टेशन मास्तर व्ही.आर. भाले, सहाय्यक पायलट सुरज इंगोले, गार्ड विनय खलको तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.