प्लास्टिक जप्त करून ठोठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 06:00 AM2020-03-07T06:00:00+5:302020-03-07T06:00:06+5:30

नागरी स्वच्छता अभियान राबविण्याबद्दल हिंगणघाट न.प. प्रशासनाला सूचना मिळताच पालिकेनेही प्रभावी अंमलबजावणीसाठी कंबर कसली. शुक्रवारी सकाळी शहरातील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानात छापा टाकून बारकाईने पाहणी केली. तपासणीदरम्यान विठोबा चौक येथील संतराम कलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून आले.

Fine plastic fine and knock | प्लास्टिक जप्त करून ठोठावला दंड

प्लास्टिक जप्त करून ठोठावला दंड

googlenewsNext
ठळक मुद्देनगर परिषदेची कामगिरी : धडक मोहिमेची व्यापाऱ्यांमध्ये धडकी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : हिंगणघाट नगरपालिका प्रशासनाने प्लास्टीकमुक्त शहर या हेतूने धडक मोहीम हाती घेतली आहे. हिच मोहीम शुक्रवारी प्रभावीपणे राबवून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या जप्त करून काही व्यावसायिकांना दंड ठोठावण्यात आला आहे. पालिकेच्या या धडक मोहिमेमुळे कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºया व्यावसायिकांत धडकी भरली आहे.
नागरी स्वच्छता अभियान राबविण्याबद्दल हिंगणघाट न.प. प्रशासनाला सूचना मिळताच पालिकेनेही प्रभावी अंमलबजावणीसाठी कंबर कसली. शुक्रवारी सकाळी शहरातील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानात छापा टाकून बारकाईने पाहणी केली. तपासणीदरम्यान विठोबा चौक येथील संतराम कलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून आले. तेथून सुमारे २० किलो प्लास्टिक जप्त करून व्यावसायिक प्रतिष्ठानाच्या संचालकाला दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर याच भागातील अशोक गुजर यांच्या दुकानातून ५ किलो प्लास्टिक जप्त करून ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय आठवडी बाजार येथील जितेंद्र शंभरकर यांच्या दुकानातून ५ किलो प्लास्टिक जप्त करून ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अनिल जगताप, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्या मार्गदर्शनात चंद्रकांत पाटील, विशाल ब्राह्मणकर, मिलिंद पिंपळखुटे, अभिलाष अलोणी, सागर डेकाटे, प्रवीण काळे, हाफिज शेख, अजय वकील, अनिल झाडे, माणिक चांगल, बंडू पराते यांनी केली.
 

Web Title: Fine plastic fine and knock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.