इटलीची ‘फनफिला’ भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:08 AM2018-10-18T00:08:18+5:302018-10-18T00:09:23+5:30

सध्या भारतीयांंकडून पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब केला जात असला तरी विदेशातील नागरिक भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक होत असल्याचे दिसून येते. प्रेम विवाह झाल्यानंतर प्रथमच पतीसह भारत वारीवर आलेल्या रोम इटली येथील फनफिला चँग लिआॅन या महिलेने वर्धेतील श्री दुर्गा पूजा उत्सव समिती, वनमाली मेडीकल चौक, .......

Finnish 'Funfilah' in front of Indian culture | इटलीची ‘फनफिला’ भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक

इटलीची ‘फनफिला’ भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक

Next
ठळक मुद्देअष्टमीच्या हवन पूजेला बसून आदीशक्ती चरणी अर्पण केली श्रद्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या भारतीयांंकडून पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब केला जात असला तरी विदेशातील नागरिक भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक होत असल्याचे दिसून येते. प्रेम विवाह झाल्यानंतर प्रथमच पतीसह भारत वारीवर आलेल्या रोम इटली येथील फनफिला चँग लिआॅन या महिलेने वर्धेतील श्री दुर्गा पूजा उत्सव समिती, वनमाली मेडीकल चौक, मेन रोड येथे अष्टमीच्या हवन पूजेला बसून भारतीय संस्कृतीचे धडे घेतले. इतकेच नव्हे तर त्यांचे पती सारंग काशीनाथ रडके यांच्यासह आदीशक्ती चरणी माथा टेकला.
मूळचे अकोला जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी असलेल्या सारंग काशीराम रडके यांनी आपल्या मुळ गावी सॉफ्टवेअर इंजिनिअरींगचे धडे घेतले. त्यानंतर त्यांना कामानिमित्त विदेशवारीचा योग आला. याच दरम्यान दुबई येथे थाई शेफ असलेल्या फनफिला चँग लिआॅन यांच्याशी ओळख झाली. आठ वर्षांपूर्वीच्या ओळखीने प्रेमाकडे वाटचाल करीत पुढे हे दोघेही पे्रम विवाहाच्या बंधनात अडकले. सन २०१७ मध्ये प्रेमविवाह झाल्यानंतर गणपती उत्सवादरम्यान सारंग व फनफिला हे दोघेही सारंगचे मामा सुरेश बडे यांच्याकडे वर्धेत आले. त्यापूर्वी सारंगने वर्धा शहराशेजारी नालवाडी भागात सदनिका घेतली होती. त्याच सदनिकेत सध्या हे नवविवाहित दाम्पत्य वास्तव्याला आहे. बुधवारी या नवविवाहित दाम्पत्याने नवरात्री उत्सवादरम्यान अष्टमीच्या हवन पूजेला यजमान म्हणून हजेरी लावत आदीशक्तीची उपासणा केली.

इंडियात ‘नमस्कार’ तर थाईमध्ये ‘स्वधीखा’ असे संबोधले जाते. भारतात मी पहिल्यांदाच आली असून येथे आल्यावर मला आनंद झाला. येथील नागरिक चांगले आहेत. राम, सीता व हनुमान याबाबत मी आपल्या देशातही माहिती घेतली होती. भारतात येऊन मला खऱ्या अर्थाने राम, सीता व हनुमानाची आराधना करणाऱ्यांना जाणता आले. भारतातील साडी वेगळीच असून साडीमध्येही विविध प्रकार आहेत.
- फनफिला चँग लिआॅन, नव विवाहिता.

जेवण करायला गेला अन् पे्रमात पडला
थाई शेफ असलेल्या फनफिला चँग लिआॅन हिच्याशी सारंग रडके याची ओळख दुबई येथे आयोजित फुड फेस्ट मध्ये झाली. तेथे जेवन करताना सारंग हा फनफिलाच्या प्रेमात पडल्याचे तो सांगतो.
इंग्रजीसह थाई भाषेचेच ज्ञान
फनफिला हिला केवळ थाई व इंग्रजी येते. एखाद्याने फनफिलाशी संवाद साधल्यावर सारंग हा त्या व्यक्तीचे म्हणणे ट्रान्सलेट करून फनफिलाला समजावून सांगतो. सारंग याने फनफिला हिच्या प्रेमात पडल्यानंतर थाई भाषा शिकली, हे विशेष.

अष्टमीच्या हवन पूजेत राज्यात पहिल्यांदा विदेशी महिला बसली असावी, असा आपला दावा नाही; पण वर्धेतील ही पहिलीच घटना असावी.
- कमल कुलधरिया, माजी न.प. उपाध्यक्ष, वर्धा.

पत्नी फनफिला हिला भारतीय संस्कृतीबाबत आदर आहे. तिला ती जाणून घेण्याची उत्सूकताही आहे. मी हवन बघीतला आहे. परंतु, लग्नानंतर हवनमध्ये बसण्याची फनफिला व माझी पहिलीच वेळ आहे. त्याबाबत तीही आनंदी आहे.
- सारंग रडके, नवविवाहित, सॉफ्टवेअर अभियंता.

Web Title: Finnish 'Funfilah' in front of Indian culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.