मैत्रेय संस्थेवर गुन्हा दाखल

By admin | Published: February 3, 2017 02:32 PM2017-02-03T14:32:15+5:302017-02-03T14:32:15+5:30

संपूर्ण राज्यातील नागरिकांना गुंतवणुकीच्या नावावर गंडा घालणा-या मैत्रेय संस्थेच्या संचालकांवर वर्धेतील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR filed against Maitreya Institute | मैत्रेय संस्थेवर गुन्हा दाखल

मैत्रेय संस्थेवर गुन्हा दाखल

Next

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. 3 - संपूर्ण राज्यातील नागरिकांना गुंतवणुकीच्या नावावर गंडा घालणा-या मैत्रेय संस्थेच्या संचालकांवर वर्धेतील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री कारण्यात आली. तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील वसई येथील मैत्रेय प्लॉट्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेडचे संचालक वर्षा मधूसूदन सतपाळकर, जनार्दन अरविंद परूळेकर या दोघांवर भादंविच्या ४२०, ४०६, १२० (ब) व ३४ तसेच सहकलम ३, ४ एमपीडीए अ‍ॅक्ट, सहकलम ३, ४, ५, ६ टीसीएमएस अधिनियम १९७८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे. 
 
या प्रकरणातील आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी कारागृहात झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे येथील मैत्रेय प्लॉट्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेडच्यावतीने नागरिकांना गुंतवणुकीच्या माध्यमातून ११.५० टक्के व्याज देण्याचे आमिष देण्यात आले.
 
यात वाढलेली रक्कम अथवा त्या मोबदल्यात प्लॉट देण्याचे आमिष देण्यात आले होते. यानुसार वर्धेतील शितल किशोर शेंद्रे रा. पिपरी (मेघे) यांनी १ लाख ८४ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र त्यांना ठरलेल्या कालावधीनंतर अपेक्षित रक्कम मिळाली नाही. यामुळे त्यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामनगर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
 

Web Title: FIR filed against Maitreya Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.