वर्ध्यात आरटीओ कार्यालयाला आग; संगणकांसह कागदपत्राची राख

By आनंद इंगोले | Published: June 11, 2023 08:07 PM2023-06-11T20:07:49+5:302023-06-11T20:08:23+5:30

आग विझविण्यासाठी धडपड : शॉर्ट सर्किटचा अंदाज, फायर ऑडिटचे वावडे

Fire at RTO office in Wardhya; Ashes of documents with computers | वर्ध्यात आरटीओ कार्यालयाला आग; संगणकांसह कागदपत्राची राख

वर्ध्यात आरटीओ कार्यालयाला आग; संगणकांसह कागदपत्राची राख

googlenewsNext

वर्धा : येथील प्रशासकीय भवनातील पहिल्या माळ्यावर असलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाला अचानक आग लागल्याने संगणक संचासह कागदपत्रांची राख झाली. ही आग सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान उघडकीस आल्याने नियंत्रण मिळविण्यासाठी एकच धावपळ उडाली. या आगीने पुन्हा एकदा शासकीय कार्यालयातील फायर आॅडीटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रशासकीय इमारतीत तळ मजल्यापासून तर वरच्या तीन माळ्यावर एकूण १२ ते १३ शासकीय कार्यालय आहे. आज रविवार असल्यामुळे सर्वच कार्यालय बंद होते. सायंकाळच्या सुमारास पहिल्या माळ्यावरील आरटीओच्या कार्यालयातून धूर बाहेर निघताना दिसला. काही वेळातच खिडक्यांमधून आगीचे लोळ बाहेर येवू लागले. याची माहिती प्रशासनासह नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांना देण्यात आली. त्यामुळे मुख्याधिकारी राजेश भगत अग्निशमन दलासह दाखल झाले. दोन अग्निशमन बंबाने पाण्याचा मारा करण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळू भागवत यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी आणि आरटीओ विभागाचे वाहन निरीक्षक विशाल मोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. या इमारतीचे फायर आॅडीट झाले नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी आरटीओ विभागातील आग विझविण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागली.

Web Title: Fire at RTO office in Wardhya; Ashes of documents with computers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.