ग्रामीण भागात पेट्रोल पंपांचे फायर आॅडिट रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:58 PM2018-05-27T23:58:20+5:302018-05-27T23:58:20+5:30

सूर्याची दाहकता अद्याप कमी झाली नसून पारा ४५ अंश सेल्सीअसवर स्थिरावला आहे. उष्णतेची स्थिती ज्वलनशील पदार्थासाठी धोकादायक असतानाही ग्रामीण भागातील पेट्रोलपंपांचे ‘फायर आॅडीट’ रखडलेले आहे.

Fire audit of petrol pumps in rural areas | ग्रामीण भागात पेट्रोल पंपांचे फायर आॅडिट रखडले

ग्रामीण भागात पेट्रोल पंपांचे फायर आॅडिट रखडले

Next
ठळक मुद्देसुरक्षा धोक्यात : तपासणीची जबाबदारी पुरवठा अधिकाऱ्यांवर

गौरव देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सूर्याची दाहकता अद्याप कमी झाली नसून पारा ४५ अंश सेल्सीअसवर स्थिरावला आहे. उष्णतेची स्थिती ज्वलनशील पदार्थासाठी धोकादायक असतानाही ग्रामीण भागातील पेट्रोलपंपांचे ‘फायर आॅडीट’ रखडलेले आहे. बहुतांश पेट्रोल पंपांवरील अग्निशामन यंत्रे कालबाह्य तथा निकामी असून आग लागल्यास ती नियंत्रणात आणणे अशक्य होईल, असे चित्र दिसत आहे.
पेट्रोलपंपांवर ग्राहकांना आवश्यक सुविधा पडताळणीची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाºयांची आहे. ग्रामीण भागात काही मोजक्याच पेट्रोलपंपांवर या सुविधा आहेत. पंप हे नियमानुसार सुरू आहेत अथवा नाही, ही खबरदारी घेण्यासाठी पेट्रोलीयम कंपन्यानीही आकस्मिक भेट देऊन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सुविधांची तपासणी करणे गरजेचे आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतरही अग्निशामक यंत्राची दुरूस्ती व बदलण्याची जबाबदारी पेट्रोलपंप मालकांनी घेतली नाही.
आग लागल्यास ती रोखण्यासाठी वा विझविण्यासाठी पेट्रोल पंपांवर असलेले ‘एक्स्टिंग्युशर’ हे कालबाह्य आहेत. या अग्निशामक यंत्रातील गॅस अथवा ड्राय केमिकल मुदतीत बदलविण्यात आलेले नाही. काही पंपांवर आहे की नाही, हे सुद्धा माहिती नाही. पेट्रोल पंपांवर स्वतंत्र ५ ते १० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असणे आवश्यक आहे; पण तेही दिसून येत नाही. पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आग विझविण्यासठी लोखंडी बादल्यामध्ये वाळू (रेती) भरून ठेवली जाते; पण काही पेट्रोलपंपांवर त्या बकेटही नाही तर काही पेट्रोल पंपांवर बकेटमधील रेतीची माती झालेली आहे.
पेट्रोलपंप मालक हे केवळ व्यावसायिक हित जपत असून त्यांनी ग्राहकांच्या सुरक्षिततेचे धिंडवडे काढले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाºयांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष असून पेट्रोलपंपांवर अप्रिय घटना घडल्यास कोण जबाबदारी स्वीकारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूण वर्धा तालुक्यातील पंपांवर सुरक्षा रामभरोसे दिसत आहे.
पेट्रोल चोरीलाही उधाण
काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल चोरीची घटना उघडकीस येत असतात. काही पेट्रोल पंपांवर पाईपद्वारे पेट्रोलऐवजी हवाही आकली जात असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. यात पेट्रोल पंपांवरील पेट्रोल भरणारा पाईप काळ्या रंगाचा असतो. त्या ऐवजी पाईप हा पांढरा म्हणजे पारदर्शक पाईप लावल्यास पेट्रोल टाकीत जाताना दिसेल. यावरून पेट्रोल भरताना नागरिकांनाही आपल्या गाडीमध्ये किती पेट्रोल पडते, याचा अंदाज येऊ शकेल. याद्वारे पेट्रोल चोरीला आळा बसू शकेल.

Web Title: Fire audit of petrol pumps in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.