आगीमुळे झाली घराची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 09:44 PM2018-01-18T21:44:49+5:302018-01-18T21:45:13+5:30

हिंगणघाट पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मांडगाव येथील अशोक वारलुजी तडस यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला. ही गुरुवारी पहाटेच्या सुमरास उघड झाली.

The fire came due to the house of Rakharangoli | आगीमुळे झाली घराची राखरांगोळी

आगीमुळे झाली घराची राखरांगोळी

Next
ठळक मुद्देमांडगाव येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर/ मांडगाव : हिंगणघाट पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मांडगाव येथील अशोक वारलुजी तडस यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला. ही गुरुवारी पहाटेच्या सुमरास उघड झाली.
या आगीचे लोळ उठल्यानंतर गावकऱ्यांनी घराकडे धाव घेतली. मात्र आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. या आगीच्या ज्वाळांमुळे जवळपास विद्युत तारांचेही नुकसान झाले. या आगीत अशोक तडस यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. गत काही दिवसांपासून तडस यांचा परिवार म्हसाळा येथे जावून होता. त्यामुळे जीवितहानी टळली. आजूबाजूच्या लोकांनी जवळपास दोन तास पाण्याचा वर्षाव करून आग विझविली. त्यामुळे शेजाऱ्यांची घरे बचावली. यात अशोक तडस यांचे जवळपास एक ते दीड लाखांचे नुकसान झाले. रोजमजुरी करून तीन मुलांचे शिक्षण व परिवार चालविणे व यात त्यांच्यावर असे संकट ओढवले. त्यामुळे ते पूर्णत: खचून गेले. या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आग कशाने लागली हे कळू शकले नाही.

Web Title: The fire came due to the house of Rakharangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग