इंडियन कोकोनट क्रशिंग कंपनीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:54 PM2018-05-29T22:54:27+5:302018-05-29T22:54:40+5:30
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ वसाहत येथील इंडियन कोकोनट क्रशिंग कंपनीला मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. त्या आगीत लाखोंचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ वसाहत येथील इंडियन कोकोनट क्रशिंग कंपनीला मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. त्या आगीत लाखोंचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
सेवाग्राम येथील महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ वसाहत मध्ये नागपूर येथील रविराज झंवर यांच्या इंडियन कोकोनट क्रशिंग कंपनीला आज पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये बायोमास विक्रेट रॉमटेरियल साहित्य जळून खाक झाले, तर कंपनीच्या आत असलेल्या सर्व मशनिरी जळाल्या. यात कंपनी मालकाचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पहाटे ५ वाजताच्या सुमारास लागलेली आग १२ तासानंतर आटोक्यात आली. आग विझविण्याकरिता वर्धा नगर परिषद, उत्तम गॅलवा व नगर परिषद देवळी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. १२ तासाच्या नंतर आग आटोक्यात आली आहे. अगीचे कारण कळू शकले नाही.