आगीच्या लोळांनी होरपळला जिल्हा

By admin | Published: May 28, 2017 12:25 AM2017-05-28T00:25:41+5:302017-05-28T00:25:41+5:30

यंदाचा उन्हाळा आगीच्या घटनांनी जिल्हा चांगलाच हादरला आहे. शनिवारी जिल्ह्यात घडलेल्या आगीच्या तीन घटनांची होरपळ ....

Fire Lol | आगीच्या लोळांनी होरपळला जिल्हा

आगीच्या लोळांनी होरपळला जिल्हा

Next

भिष्णूर, वर्धा व पवनारात नुकसान : ड्रीमलॅन्ड सिटीत स्फोटाचा हादरा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाचा उन्हाळा आगीच्या घटनांनी जिल्हा चांगलाच हादरला आहे. शनिवारी जिल्ह्यात घडलेल्या आगीच्या तीन घटनांची होरपळ अनेकांना चटका देणारी ठरली. आष्टी तालुक्यातील भिष्णूर येथे दुपारी अचानक लागलेल्या आगीत १५ कुटुंब उघड्यावर आले तर वर्धेलगतच्या सावंगी (मेघे) येथील ड्रीमलॅन्ड सिटीच्या सुरक्षा रक्षकाच्या घराला आग लागली. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला. पवनार येथे लागलेल्या आगीत गोठ्यातील साहित्याची राख झाली.
जिल्ह्यात तीनही ठिकाणी लागलेल्या आगीवर ताबा मिळविण्याकरिता नागरिकांनीच पुढाकार घेतल्याचे समोर आले. भिष्णूर येथील स्थिती आटोक्यात आणण्याकरिता अग्निशमन दलासह सिडेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी धावपळ केली. वर्धेत मात्र अग्निशमन दलाला पोहोचण्यास विलंब झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला. आग लागलेले घर एकटे असल्याने त्याचा विशेष विपरित परिणाम झाला नाही. पवनार येथील गोठ्याला आग लागल्याची माहिती मिळताच सेवाग्रामचे ठाणेदार पिदूरकर यांनी घटनास्थळ गाठत वेळीच बैल सोडल्याने त्यांचे प्राण बचावले; पण यात शेतकऱ्याने खरीप हंगामाकरिता आणलेले बियाणे आणि खत जळून खाक झाले.

 

Web Title: Fire Lol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.