उद्योगांतील अग्निसुरक्षा यंत्रणा नाममात्रच

By admin | Published: May 8, 2014 02:06 AM2014-05-08T02:06:31+5:302014-05-08T02:06:31+5:30

परिसरात कापूस जंतुजन्य तसेच तेल उद्योग मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र सुरक्षा विषयक सूचनांना उद्योजक वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याने दरवर्षी आगीमुळे..

The fire safety device industry is nominally nominated | उद्योगांतील अग्निसुरक्षा यंत्रणा नाममात्रच

उद्योगांतील अग्निसुरक्षा यंत्रणा नाममात्रच

Next

भास्कर कलोडे■ हिंगणघाट
परिसरात कापूस जंतुजन्य तसेच तेल उद्योग मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र सुरक्षा विषयक सूचनांना उद्योजक वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याने दरवर्षी आगीमुळे मनुष्य हानी व कोट्यवधीची वित्त हानी होत आहे. प्रशासकीय यंत्रणांकडून मात्र कारवाई होत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. देवळीतील घटनेने सुरक्षेची बाब पुन्हा ऐरणीवर आली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक तेल व कापूस प्रक्रिया उद्योग हिंगणघाट परिसरात आहे. या उद्योगात ज्वलनशील घटकांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असल्याने सुरक्षा विषयक सुचनांचे तंतोतंत पालन सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. संबंधीत खात्यांकडून या विषयी सूचना देण्यात येत असल्यातरी त्याचे पालन होत नसल्याचे आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातांमुळे उघड झाले आहे. या उद्योगात लागलेल्या आगीत कोट्यवधीचा कापूस, रूई, सरकी, गाठी, मशनरी तसेच तेल संयत्राचे नुकसान झाले आहे, तर कामगारसुध्दा आगीत होरपळून मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी अशा उद्योगात सुरक्षा विषयक सूचनांचे काटेकोर पालन होने आवश्यक आहे. ते हाते वा नाही याची चाचपणी करण्याची सवडही शासकीय यंत्रणांना नाही. यंदा तापमान ४२ डिग्रीपर्यंत गेले असून पारा पुढेही वाढण्याची शक्यता आहे. उष्ण वातावरणात आगीची संभावना अधिक असताना सुरक्षा विषयक सुचनांकडे गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. अनेक घटनामध्ये विजेचे प्रमुख कारण दर्शविण्यात येते. त्यापैकी अनेक घटना संयंत्र चालु बंद करताना होणार्‍या संयंत्राच्या घर्षणातून निघणार्‍या ठिणग्या कारणीभूत असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे स्वीच गेटस्मधील जंतुजण्य रूईची साफ सफाई वेळोवेळी आवश्यक आहे. उद्योग व्यवस्थापनाचे दुर्लक्षामुळे लागणार्‍या आगीमुळे होणार्‍या राष्ट्रीय संपत्तीच्या हानीसाठी व मानवी जीवणाच्या होळीसाठी कारणीभूत अशा घटनांची चौकशी व दोषीवर कारवाईची गरज आहे. सदर अपघात विमा रक्कमेसाठी की निष्काळजीपणामुळे याची चौकशी होण्याची गरज आहे.

उद्योगापर्यंत वीज पुरवठा करण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची असून उद्योगाच्या आतील वीज वाहिनी व सुरक्षित वीज वापराची जबाबदारी उद्योजकांची आहे. या दृष्टीने सुरक्षीतता बाळगली पाहिजे.
- मंगेश वैद्य
कार्यकारी अभियंता, हिंगणघाट

Web Title: The fire safety device industry is nominally nominated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.