भाजी बाजारात दुकानाला आग
By admin | Published: April 10, 2017 01:27 AM2017-04-10T01:27:11+5:302017-04-10T01:27:11+5:30
येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील रविवारी दुपारी गवताला आग लागली. ही आग क्षणात लगतच्या भाजी बाजारात पोहोचली.
पुलगाव : येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील रविवारी दुपारी गवताला आग लागली. ही आग क्षणात लगतच्या भाजी बाजारात पोहोचली. यात बाजारातील एका दुकानाचा मागील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी आला. यात दुकानातील लाकडी आलमाऱ्यासह प्लास्टिकचे २०० कॅरेट जळून खाक झाले. यात दुकान मालकाचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
येथील कॅम्परोडवरील भाजी बाजारात शेख जुबेर अब्दुल कलाम यांचे दुकान आहे. त्यांनी पिकल्या आंब्याचा साठा करण्याकरिता या दुकानात प्लास्टिकचे जवळपास ५०० कॅरेट ठेवले होते; परंतु या लागलेल्या आगीत २०० कॅरेट व त्यातील लसन, अद्रक व आलू आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी आले. परिसरातील काहींनी पाण्याचा मारा करून आग विझविली. याच परिसरात लाकडाचे खोड जळत असल्याची माहिती काही युवकांनी रेल्वे पोलिसांना दिली; परंतु त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. केंद्रीय दारूगोळा भांडाराचे अग्निशामक दलाने दुकानावर पाण्याचा मारा केला आणि जळते खोड विझविले. आग विझविण्याकरिता परिसरातील देवेंद्र सोनटक्के, जाकीर हुसेन, के.टी. बोहरा, विजय, कपील शुक्ला, झाडे, बैस, लतीफभाई, सोनू फारूक हुसेन, तौफीक, मोनू या युवकांनी प्रयत्न केले.(तालुका प्रतिनिधी)