विदर्भ कोंकण बँकेत आग

By admin | Published: March 14, 2016 02:07 AM2016-03-14T02:07:05+5:302016-03-14T02:07:05+5:30

शहरातील मालगुजारीपुरा परिसरातील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला लागलेल्या आगीत बँकेतील साहित्य जळाले. ...

Fire at Vidarbha Konkan Bank | विदर्भ कोंकण बँकेत आग

विदर्भ कोंकण बँकेत आग

Next

शॉर्ट सर्किटचा संशय : नुकसानीचा अंदाज करणे कठीण ं
वर्धा : शहरातील मालगुजारीपुरा परिसरातील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला लागलेल्या आगीत बँकेतील साहित्य जळाले. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. ही आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली हे अद्याप कळू शकले नाही. मात्र बँक व्यवस्थापनाकडून शॉर्ट सर्कीटचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
आग आटोक्यात आणण्याकरिता वर्धा पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याने यात किती रुपयांचे नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मालगुजारीपुरा परिसरात रूपराव डफरे यांच्या घरी विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेची शाखा आहे. रविवारी सुटी असल्याने बँक बंद होती. सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान आसपासच्या नागरिकांना बँकेच्या आतून धूर बाहेर निघत असल्याचे लक्षात आले. काही नागरिकांनी निरखून पाहिले असता त्यांना बँकेच्या आत आग लागली असल्याचे लक्षात आले. ही माहिती तात्काळ शहरातील अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले; परंतु बँक बंद असल्याने आग विझविणे सहज शक्य नव्हते. महत्प्रयासाने बँकेचे दार तोडून आग विझविण्यात आली. वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. चार्ली पथकाच्या दोन पोलिस कर्मचारीही घटनास्थळी पोहचले. शॉटसर्किटमुळे ही लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. बँकेत सर्वत्र धूर पसरल्याने नुकसानीचा अंदाज येत नव्हता.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Fire at Vidarbha Konkan Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.