लाकूड टाल व गादी सेंटरला आग
By admin | Published: March 13, 2016 02:26 AM2016-03-13T02:26:12+5:302016-03-13T02:26:12+5:30
स्थानिक आठवडी बाजार चौकातील लाकडी टाल व गादी कारखान्यात आग लागली. यात एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
कारण गुलदस्त्यात : एक लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज
देवळी : स्थानिक आठवडी बाजार चौकातील लाकडी टाल व गादी कारखान्यात आग लागली. यात एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शुक्रवारच्या रात्री १२ वाजताच्या दरम्यान ही आग लागली. न.प. टँकरच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्यात आली.
बाजार चौकात गोविंद गोमासे यांच्या मालकीचे लाकडाचा टाल असून यामध्ये सागवानी फाटे, निलगिरी फाटे, बांबू, ताटवे व इतर साहित्यांचा भरणा होता. शेख हबीब अब्दुल रहिम यांच्या मालकीचे गादी कारखान्यातील रूई, कापूस व यावर प्रक्रिया करणारे रेचे होते. रात्री १० वाजताच्या दरम्यान या दोघांनीही आपली दुकाने बंद करून घर गाठले. दरम्यान रात्री १२ वाजता या दोन्ही दुकानांना अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने भिषण रूप धारण केले. लोकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर न.प.च्या टँकरला बोलावून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तोपर्यंत दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते.
यामध्ये दोन्ही दुकानदारीचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील मद्यपींच्या उचापतीमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.(प्रतिनिधी)