आगीत शेतीसाहित्याची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:17 PM2019-05-17T22:17:32+5:302019-05-17T22:18:01+5:30
येथील भाऊराव खंडूजी पलकंडवार यांच्या वाई शिवारातील शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतातील ठिबक सिंचन संचातील संपूर्ण यंत्रे, नळ्या व ३ हजार वेळू जळून खाक झालेत. शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांवर नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : येथील भाऊराव खंडूजी पलकंडवार यांच्या वाई शिवारातील शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतातील ठिबक सिंचन संचातील संपूर्ण यंत्रे, नळ्या व ३ हजार वेळू जळून खाक झालेत. शेतकºयाचे अंदाजे ३ लाखांवर नुकसान झाले.
भाऊराव पलकंडवार यांचे वाई शिवारात तीन एक शेत आहे. त्या शेतात त्यांनी ठिंबक सिंचन योजना घेतली होती. शेतातून जाणाऱ्या वीजतारा तंगावे नसल्याने बऱ्याच दिवसांपासून लोंबकळत होत्या. या तारांमुळे आग लागू शकते म्हणून शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात अनेकदा तक्रार केली. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केले. याचाच परिणाम लोंबकळणाऱ्या तारांमध्ये घर्षण होऊन शेतात ठिणगी पडली. त्यातून लागलेल्या आगीमुळे शेतातील ठिंबक सिंचनाचे संयंत्र शेतात पसरविण्यासाठी जमा करून ठेवलेल्या नळ्या, तारांचे बंडल, तुषार सिंचनाचा संच व तीन हजार वेळू जळाले.
या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांचे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या तक्रारीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाºयांनी वेळीच लक्ष दिले असते तर ही घटना टाळता आली असती, अशी परिसरातील शेतकऱ्यांची भावना आहे. घटनेविषयी वीज वितरण कंपनीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन घटनेचा पंचनामा केल्याच माहिती आहे. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे. घटनेची अधिक पाहणी करण्यासाठी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा येणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले.