राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीत जिल्हाधिकाऱ्यांची पहिली नोंद

By admin | Published: October 11, 2015 12:23 AM2015-10-11T00:23:28+5:302015-10-11T00:23:28+5:30

सामान्य नागरिकांच्या तपशिलाची सत्यता पडताळण्याबरोबरच एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर) डेटाबेस अद्यावत करण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू झाली आहे.

The first record of the District Collector, in registering the National Population | राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीत जिल्हाधिकाऱ्यांची पहिली नोंद

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीत जिल्हाधिकाऱ्यांची पहिली नोंद

Next

नोंदवही अद्ययावतीकरण मोहिमेला प्रारंभ : नवीन कुटुंबांचा समावेश, घरोघरी भेट देत माहितीचे संकलन
वर्धा: सामान्य नागरिकांच्या तपशिलाची सत्यता पडताळण्याबरोबरच एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर) डेटाबेस अद्यावत करण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू झाली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी स्वत: एनपीआरमध्ये आधार क्रमांकाचे शनिवारी समयोजन करून झाला. ही विशेष मोहीम ९ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून प्रत्येक नागरिकाने एनपीआरमध्ये आधार क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी एनपीआर डेटाबेसमध्ये जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी अद्यावत करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी जी.सी. टेंभुर्णे, सहायक शिक्षक निलेश गुल्हाने, ए.एम. तुरक्याल, ए.पी. वाशिमकर, पी.एच. वाघ, भारती चांदेकर, वंदना दांडेकर यांची उपस्थिती होती.
घरोघरी भेटी देऊन गणनेच्या माध्यमातून डेटाबेसमध्ये आधार कार्डाचे समायोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन निवासी अथवा कुटुंबांचाही यात समावेश करण्यात येणार आहे. डेटाबेस अद्यावतीकरणासाठी ९ नोव्हेंबर २०१५ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. डेटाबेस अद्यावत करताना सरकारी अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन एनपीआर डेटाबेससाठी आधार क्रमांकाचे समायोजन करणार असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी यावेळी केले.
रजिस्टरमध्ये अद्यावतीकरण करताना जर आधार क्रमांक उपलब्ध असेल तर विहित जागेत सर्व सामान्य निवासीकरिता आधारकार्डावरून एकदम डाव्या बाजूने सुरुवात करून काळजीपूर्वक १२ अंकी आधार क्रमांक नोंदवावा. उपलब्ध नसेल तर पोचपावतीवरून २८ अंकी इआयडी क्रमांक नोंदवावा. नाव नोेंदविलेले आहे, परंतु आधार क्रमांक उपलब्ध नाही अशांच्या बाबतीत उपलब्ध नाही या चौकोनात नोंद करावी. आधारकरिता नाव नोंदविलेले नसेल तर नोंदणी केलेली नाही, अशी खूण करावी. उपलब्ध असल्यास प्रत्येक सामान्य निवासींचा १० अंकी मोबाईल क्रमांकाचीही नोंद घ्यावी.
क्षेत्र कार्यादरम्यान प्रगणकाला नवीन सामान्य निवासी अथवा नवीन कुटुंबे आढळल्यास त्यांची माहितीही एनपीआर पुस्तिकेतील कोऱ्या नवीन एनपीआर पत्रकामध्ये भरावी, अशा सूचनाही केल्या. क्षेत्रीय कार्य संपल्यानंतर अद्यावत केलेली माहिती एनपीआर पुस्तिका आणि इतर साम्रगी चार्ज अधिकाऱ्यांकडे वेळेत सूपूर्द करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
१२ अंकी आधार क्रमांक महत्त्वाचा
जिस्टरमध्ये अद्यावतीकरण करताना जर आधार क्रमांक उपलब्ध असेल तर विहित जागेत आधारकार्डावरून एकदम डाव्या बाजूने सुरुवात करून काळजीपूर्वक १२ अंकी आधार क्रमांक नोंदवावा. कार्ड उपलब्ध नसल्यास पोचपावतीवरून २८ अंकी इआयडी क्रमांक नोंदवावा.

Web Title: The first record of the District Collector, in registering the National Population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.