पहिले दोन दिवस कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:17 AM2017-10-28T01:17:17+5:302017-10-28T01:17:33+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या नावाने जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या याद्यांचे काम पूर्ण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या नावाने जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या याद्यांचे काम पूर्ण झाले. यानंतर गुरुवारी याद्यांत नाव असलेल्या शेतकºयांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. वर्धेत मात्र रक्कम जाहीर होण्याचे पहिले दोन दिवस कोरडेच गेले आहेत. येथील एकाही शेतकºयाच्या कर्जखात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे समोर आले आहे.
शेतकºयांचे अर्ज सादर केल्यानंतर त्या याद्या तयार करण्याची जबाबदारी बँकांकडे देण्यात आली होती. यात एकाच शेतकºयाचे पुन्हा अर्ज आल्याने त्याचे अर्ज बाद ठरवून त्याच्यावर असलेल्या कर्जाचा तपशील तयार करून याद्या तयार करावयाच्या होत्या. वर्धेत अद्याप या याद्याच तयार झाल्या नसल्याची माहिती आहे. यामुळे वर्धेतील शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याकरिता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे. कर्जमाफीची रक्कम बँकेत जमा होईल असे म्हणत शासनाच्यावतीने मंत्र्याच्या हस्ते जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम झाला. मात्र ज्या शेतकºयांना प्रमाणपत्र देण्यात आले त्यांची नावेही यादीत नसल्याचे दिसून आले आहे.
वर्धा जिल्ह्यात सुमारे एक लाख शेतकºयांनी कर्जमाफीचा अर्ज भरला आहे. यातील १० टक्के शेतकºयांचे दुबार अर्ज आले असले तरी इतर शेतकºयांचे अर्ज कायम राहणे अपेक्षित धरून त्यांची यादी आतापर्यंत तयार होणे गरजेचे होते. येथे मात्र तसे झाले नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १०० शेतकºयांची यादी तयार असल्याचे दिसून आले आहे. ज्या शेतकºयांची नावे यादीत आहे त्यांनाही कर्जमाफी योजनेच्या रकमेचा लाभ मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. एकाही शेतकºयाचे कर्जखाते सध्या निल झाले नसल्याचे दिसून आले आहे. ही रक्कम मिळण्याकरिता वर्धेतील शेतकºयांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. बँकांकडून अद्याप याद्या अद्यावत करण्याचे काम पूर्ण झाले नाही. परिणामी रबीच्या हंगामातही खरीपाच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल अथवा नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.
रक्कम जमा करण्याच्या काळातही याद्या अपडेट नाही
कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर आॅनलाईन अर्ज करण्याच्या सूचना झाल्या. शेतकºयांनी अर्ज भरले. त्या याद्या अपडेट करण्याच्या सूचना बँकेला देण्यात आल्या होत्या. मात्र वर्धेत शेतकºयांचे एकूण खाते किती याचीही माहिती तयार नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे या संदर्भात केवळ एकाच बँकेची माहिती आहे. बँक आॅफ इंडियातील ४० हजार शेतकºयांना २७० करोड रुपयांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती आहे. इतर बँकांची माहिती त्यांच्याकडे नसल्याचे सांगण्यात आले आहे.
रक्कम जमा करण्यासंदर्भात बँकांना सूचना नाही
शासनाने शेतकºयांचे कर्जखाते निल करण्याची घोषणा केली. कर्जाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले. मात्र शेतकºयांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा करण्यासंदर्भात बँकांना मात्र कुठल्याही सूचना नसल्याची माहिती आहे.
रबीच्या हंगामातही खरीपाची कर्जमाफी नाही
शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी शेतकºयांना खरीपाच्या हंगामात कामी येईल असे वाटत होते. मात्र आता खरीप संपून रबीची तयारी सुरू झाली आहे. निदान या काळात तरी शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी अपेक्षा होती. मात्र त्यांची ही अपेक्षाही फोल ठरत असल्याचे दिसत आहे. शासनाच्यावतीने शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची घोषणा केली; पण अद्याप एकाही शेतकºयांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली नाही. यामुळे शेतकºयांना या योजनेतील मदतीचा लाभ या हंगामातही मिळणे शक्य नसल्याचे दिसते.
सेवा सहकारी संस्थांतील २१,५९६ खाते
जिल्ह्यातील बºयाच शेतकºयांनी सेवा सहकारी संस्थेसह राष्ट्रीयकृत बँकांतून कर्जाची उचल केली आहे. जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थेत एकूण २१ हजार ५९६ शेतकºयांचे खाते आहे. या खात्यांची आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्याची अद्यापही सांगड घालण्याचे काम बाकी आहे. यामुळे शेतकºयांच्या याद्या तयार होण्यास आणखी किती काळ लागेल याचा नेम नाही.